Nagpur news : नागपूरमधील नवीन इंदोरा येथील बाराखोली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक मुलगा नापास झाल्यामुळे वडील रागावले. मात्र तणावात आलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

 

the student took an extreme step
नापास झाला म्हणून वडील रागावले
नागपूर :अनुत्तीर्ण झाल्यामुळे वडील रागावल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील नवीन इंदोरातील बाराखोली चौक येथे घडली. पुष्कर रतन गजभिये (वय १४) असे मृतकाचे नाव आहे.पुष्कर हा नववीत अनुत्तीर्ण झाला. वडिलाने त्याला रागावले. त्यामुळे तो तणावात राहायला लागला. शनिवारी दुपारी त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास लावलेला दिसला. फास काढून नातेवाइकांनी त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here