मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सर्वजण घरी होते त्याच दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आले, त्यावरुन असा अंदाज बाधण्यात येत आहे की आरोपींना ज्या ठिकाणी जो सापडला त्याची तिथेच हत्या केली. रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडला असता शेजारच्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चुन्नूच्या मुलासोबत कोणाचा तरी वाद सुरू होता. त्यामुळेच ही घटना घडली असावी. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
तर एसपी अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, परस्पर वादातून ही घटना घडली असावी. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. कोणत्याही प्रकारे बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न झालेला दिसला नाही. या लोकांचा काही परस्पर वाद असल्याचं दिसत आहे.
चुन्नू यांच्या मुलाचे सतत वाद व्हायचे. चुन्नू यांच्या मुलाचं सासरच्या मंडळींसोबतही पटत नव्हते. त्यामुळे चुन्नूची सून गेल्या दोन वर्षांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती. चुन्नू यांचा मुलगाही गेल्या काही दिवसांपासून घरी राहत नव्हता. त्यांच्या मुलानीच ही घटना घडवून आणल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेचा उलगडा लवकरच होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र, एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याने बांदा हादरलं आहे.