पटणा- सुशांतसोबत त्याच्या घरी राहणाऱ्या मित्राने सिद्धार्थ पिठानीने भावोजींसोबतचे व्हॉट्सअप चॅट शेअर केले होते. यानंतर सुशांतचे घरातल्यांसोबतचे संबंध बिघडले होते का असा प्रश्न उपस्थित झाला. आता त्याची बहीण श्वेताने सुशांतसोबतचे व्हॉट्सअप चॅट शेअर केले आहेत.

सुशातंच्या बहिणीचा नवरा म्हणजेच त्याचे भावोजी, ओ. पी. सिंह यांच्या एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतला संपर्क करण्यासाठी ते सुशांतचा मॅनेजर सिद्धार्थ पिठानी याला मेसेज करायचे. हे मेसेज त्यांनी सिद्धार्थ पिठानीच्या मोबाइलवर पाठवले होते.

‘मी चंदीगढला पोहोचलोय. मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलंस त्यासाठी धन्यवाद. मला माझ्या जुन्या मित्रांना भेटता आलं. तू तुझ्या करिअरचे , आयुष्याचे निर्णय स्वत: घेत नाही. मी योग्य अंदाज लावला आणि माझ्या प्रवासाचं नियोजन केलं. आणि माझ्या पत्नीला तुझ्या या सगळ्या समस्यांपासून दूर ठेव. तुझ्यासोबत राहणारी लोकं,तुझ्या वाईट सवयी आणि मिसमॅनेजमेंटचा तिला प्रचंड त्रास होईल,कारण ती खूप चांगली आहे’, अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता सुशांतच्या बहिणीने त्याच्यासोबचे व्हॉट्सअप चॅट शेअर केले आहेत. हे चॅट त्याच्या मृत्यूच्या २१ दिवसआधी म्हणजे २२ मे चे होते. श्वेताने चारही बहिणींचा एक कोलार्ज (प्रियांका, मीतू, नीतू आणि श्वेता) फोटो सुशांतला पाठवला. श्वेताने लिहिले की, हे आमचं कालचं वेदांता क्लासचा फोटो आहे. आम्ही अपरोक्षानुभूती केलं. लव यू भाई मिस यू. यावर रिप्लाय देताना सुशांतने लिहिले की, ‘लव यू गुडिया दी. हे फारच सुंदर आहे.’ यानंतर श्वेताने सुशांतला तिच्या घरातला एक व्हिडिओ शेअर केला.

यावर रिप्लाय देताना सुशांतने लिहिले की, ‘किती सुंदर आणि हसतमुख कुटुंब आहे. विशालला हाय बोल आणि मुलांना माझ्याकडून खूप सारं प्रेम दे.’ श्वेताने हे चॅट शेअर करत म्हटलं की, ‘तुझं आमच्यावर किती प्रेम होतं.’ श्वेताच्या या मेसेजवरून कुटुंबाकडे त्याच्यासोबतची अगणित आठवणी असतील यात काही शंका नाही. सुशांतचं जाणं या कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे हे त्यांच्या याच मेसेज आणि स्क्रिनशॉटवरून कळतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here