वॉशिंग्टन डी.सी.:काहीच दिवसांपूर्वी बंगळुरु येथे एका व्यक्तीने उड्डाणपुलावरुन पैशांचा पाऊस केला होता. असंच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. तेवढ्यात लोकांना असं काही दिसलं की ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने खिडकीतून थेट नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात केली. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल दीड कोटींहून अधिक रुपये हवेत उडवले. इतरांना काहीतरी भेट द्यायची होती, म्हणून त्याने रस्त्यावर पैसे उडवले, असं त्याने सांगितलं. हे प्रकरण अमेरिकेच्या ऑरेगॉन राज्याचे आहे.डेली स्टारच्या वृत्तानुसार, चालत्या कारमधून नोटा फेकणाऱ्या व्यक्तीचे कॉलिन डेव्हिस मॅककार्थी (वय ३८) असे आहे. कॉलिनने कारच्या खिडकीतून जवळपास २ लाख डॉलर्स म्हणजेच १ कोटी ६३ लाखांपेक्षा जास्त रोकड उडवली होती. त्याने नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात करताच रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये ते पैसे लुटण्याची स्पर्धा सुरू झाली.

आईचे अश्रू थांबेनात; वडील म्हणतात- आमचा काहीही संबंध नाही; अतिक अहमदला संपवणारा लवलेश कोण?
तर काही लोकांनी कॉलिनला तसे न करण्याचं आवाहनही केलं. कारण, त्याच्या या कृतीमुळे अपघात होऊ शकला असता. दरम्यान, युजीन महामार्गावर घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून कॉलिनला थांबवलं आणि नोटांचे बंडल ताब्यात घेतले.

पैसे उधळले म्हणून गौतमीने डान्स थांबवला, प्रेक्षकांनी राडाच घातला; कडक बंदोबस्तातही लाठीचार्जची वेळ

पालकांच्या खात्यातून काढले पैसे

कॉलिन आणि त्याच्या पालकांचे संयुक्त बँक खाते असल्याचे सांगण्यात आले आहे. या खात्यातून त्याने पैसे काढले होते. पैसे घेऊन तो गाडीत बसला आणि नंतर हायवेच्या दिशेने निघाला. इकडे कॉलिनने चालत्या गाडीची खिडकी उघडली आणि नोटांचे एक-एक बंडल हवेत उडवू लागला. यादरम्यान, त्या महामार्गावरून जाणाऱ्यांनी त्या नोटा उचलण्यास सुरुवात केली.

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. दरम्यान, कारमधून एक व्यक्ती नोटा उडवत होती. काही लोक तर रस्त्याच्या मधोमध जाऊन नोटा उचलण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या घटनेमुळे कुठलाही अपघात झाला नाही. सध्या पोलिसांनी कॉलिनवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिस त्याच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधत आहेत. जेणेकरून एवढा पैसा कुठून आला हे कळू शकेल.

५०० दिवसांसाठी २३० फूट खोल गुहेलाच घर मानलं, आता महिलेने बाहेर येऊन पाहिलं तर सारंच बदललेलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here