म. टा. वृत्तसेवा, पालघर :महाराष्ट्र राज्याच्या एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई व उपनगरात रस्ते व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई उपनगरात त्या अनुषंगाने विविध मोठे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये वर्सोवा ते विरार सीलिंग प्रकल्पाचादेखील समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून ही सीलिंक उभारली जात आहे. मात्र आता हा सीलिंक प्रकल्प पालघरपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असून, त्यासंदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालघरवासीयांना जलदगतीने मुंबईत पोहोचता येणार आहे.सीलिंक प्रकल्पामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा ते विरार सीलिंकचा विस्तार करून हा प्रकल्प पालघरपर्यंत वाढवला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्यानंतर, हा प्रकल्प पालघरपर्यंत वाढवला जात असल्याची माहिती हाती आली आहे. हा प्रकल्प रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला होता. मात्र नंतर हा प्रकल्प एमएमआरडीएकडे देण्यात आला आहे. सध्या एमएमआरडीए या प्रकल्पाचे काम पाहत आहे.

पुरंदरसाठी शिवतारे यांची अजित पवारांकडे साखर पेरणी?, पुरंदरची निवडणूक सोपे करण्याचे प्रयत्न

वांद्रे ते वरळी दरम्यानचा सीलिंक प्रकल्प आधीच पूर्ण होऊन वापरात आहे. सध्या वांद्रे ते वर्सोवा या १७ किलोमीटर लांबीच्या सीलिंकचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान वर्सोवा ते विरार हा मुंबईमधील तिसरा सीलिंक प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प पालघरपर्यंत विस्तारला जाणार आहे. हे तिन्ही प्रकल्प एकमेकांना जोडण्याची योजना एमएमआरडीएने आखली आहे.

वर्सोवा ते विरार हा सीलिंक प्रकल्प पालघरपर्यंत वाढवला जाणार आहे. पालघरपर्यंत हा प्रकल्प विस्तारणार असल्याने, याचा लाभ येथील प्रवासी, नागरिक, कारखानदार, उद्योजक आदींना होणार आहे. यामुळे या प्रवासाचा कालावधी थेट निम्म्यावर येणार आहे. एमएमआरडीने घेतलेला हा निर्णय वर्सोवा ते पालघर दरम्यानच्या प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे.

असा असेल विरार-पालघर सीलिंक प्रकल्प

– वर्सोवा ते विरार हा सीलिंक प्रकल्प पालघरपर्यंत वाढवला जाणार

– हा मार्ग जवळपास ४३ किलोमीटर लांबीचा असेल

– सागरी किनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर हा मार्ग विकसित होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here