नवी दिल्ली: संरक्षण मंत्रालयाने लडाखच्या अनेक भागांमध्ये मे महिन्यात चीनी सैन्याने घुसखोरी केल्याबाबतची कागदपत्रे प्रसिद्ध केली आहे. यानंतर याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सतत टीकास्त्र सोडणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार यांनी या वरून केंद्रकारवर हल्लाबोल केला आहे. खोटे का बोलत आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. संरक्षण मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर एक डॉक्युमेंट अपलोड केले आहे, यात चीनने मे महिन्यात सतत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control) अतिक्रमण केले असल्याचे मान्य केले आहे. विशेषत: चीनने गलवान खोरे, पँगाँग त्सो, गोगरा आणि हॉट स्प्रिंग सारख्या क्षेत्रात ही घुसखोरी केल्याचे डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

५ मेच्या नंतर चीनचे हे आक्रमक रूप प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दिसत असल्याचे या डॉक्युमेंटमध्ये म्हटले आहे. ५ आणि ६ मे याच दरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या डॉक्युमेंटमधील माहितीनुसार, चीनने १७ मे ते १८ मेदरम्यान लडाखमध्ये कुंगरांग नाला, गोगरा आणि पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तरेकडील भागांमध्ये अतिक्रमण केले आहे.

काँग्रेस पक्ष लडाखमध्ये चीनी सैन्याच्या कारवायांच्या मुद्द्यावरून सतत केंद्र सरकारवर हल्लेबोल करत आहे. चीनी सैन्याने लडाखमध्ये केलेल्या अतिक्रमणाबाबत सरकार देशाला संपूर्ण माहिती देत नाही आणि देशाला अंधारात ठेवण्याचे काम सरकारने केले आहे, असे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे.

वाचा:

या अगोदर राहुल गांधी यांनी करोनाच्या उद्रेकाबाबतही केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत. केंद्र सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे भारतात करोनाबाबत जगाच्या तुलनेत चांगली स्थिती आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यावर आकडेवारी देत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे राहुल गांधी यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या फोटोत करोना संसर्ग वाढत असलेल्या पहिल्या १० देशांमध्ये भारत अमेरिकेच्याही पुढे गेल्याचे दाखवले आहे.

वाचा:

वाचा ही बातमी:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here