हैदराबाद :सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक तेलंगणातील हैदराबादमधील वेदनादायक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं असता तिथे व्हीलचेअर न मिळाल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला चक्क ओढत वॉर्डमध्ये नेल्याचं समोर आला आहे.शनिवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची सध्या जोरदार चर्चा आहे. तर लोकांनी यामुळे संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. हे प्रकरण हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील आहे. इथे एका सीनिअर अधिकाऱ्याने सांगितलं की, लिफ्टपर्यंत नेण्यासाठी तरुणाच्या पालकांनी त्याला ओढत नेलं. कारण, रुग्णालयामध्ये व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती.

सुरत आल्याचं समजून आजी शेगाव स्थानकातच उतरल्या, पुढे २ तासांत अशी खबर आली की सगळेच हसले…
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामाबाद इथं एका ४० वर्षीय तरुणाला अल्कोहोल विथड्रॉलची लक्षण असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं होतं. ३१ मार्ज रोजी याच रुग्णाला त्याच्या पालकांनी मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात आणलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्या आई-वडिलांनी रात्रभर त्याच्यासाठी प्रार्थना केली होती.

Crime Diary: पत्नीचा मृतदेह मिठीत घेतला, किस केलं; हे प्रेम की वेडेपणा; वाचा लवर पतीची किलर कहाणी
डॉक्टरांनी सांगितलं की त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला ओढत लिफ्टपर्यंत नेले आणि नंतर दुसऱ्या वॉर्डातही ओढत नेले. याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर तुफान व्हायरल झाला असून लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित घटना ही १ एप्रिल रोजी घडली.

कोकणासाठी मोठी बातमी! पुढचे ३-४ तास धोक्याचे, घराबाहेर पडण्याआधी सावधान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here