कल्याणः१८ वर्षांची तरुणी बाल्कनीमध्ये उभी असताना सोसायटीतील स्विमिंग पूलकडे लक्ष गेले आणि तिला धक्काच बसला. तीन वर्षांची मुलगी स्विमिंग पूलमध्ये बुडत असल्याचे लक्षात येताच ती धावतच खाली आली आणि चिमुरडीचा प्राण वाचवला. १८ वर्षांच्या या तरुणीने दाखवलेले प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला आहे. त्यामुळं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे.बदलापूर येथील मोहन तुळसी विहार सोसायटीत हा प्रकार घडला आहे. तीन वर्षांची अंशिका स्विमिंग पूलजवळ खेळत होती. खेळत असताना अचानक तिचा पाय घसरला व ती स्विमिंग पुलमध्ये कोसळली. त्याचवेळी घराच्या बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या निधी उमरानिया या तरुणीने अंशिकाला स्विमिंग पुलमध्ये पडलेले पाहिले. तेव्हा ती तातडीने सोसायटीच्या कंपाउंडमध्ये आली. तिने पूलमध्ये उडी मारुन अंशिकाला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तेव्हा निधीने तिला सीपीआर देत शुद्धीवर आणले.

उन्हामुळं मृत्यू होऊ शकतो का, उष्माघात झाल्यास काय उपचार कराल?; सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
अंशिकाचा जीव वाचवल्यानंतर निधी म्हणते की, मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये उभी होते. त्याचवेळी आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या मुलीला मी पूलमध्ये पाहिले. पण तेव्हा ११ वाजले होते. इतक्या रात्री तिला पूलमध्ये पाहून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितले. पण थोड्याचवेळात मला पूलमध्ये कोणतीच हालचाल जाणवली नाही. तेव्हाच मला थोडी शंका आली की ती बुडतेय. म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता धावतच खाली उतरले व स्विमिंग पूलमध्ये उडी घेत तिला बाहेर काढले.

महाराष्ट्र भूषणः ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू; ८ मृतांची ओळख पटली; प्रशासनाकडून नावे जाहीर
आंशिकाला बाहेर काढल्यानंतरही ति कोणतीच हालचाल करत नव्हती. म्हणून मी ओटीपोटावर दाब देत पोटातून पाणी बाहेर काढायला सुरुवात केली. मात्र, तरीही आंशिका काहीच हालचाल करत नव्हती. शेवटी मी तिचं नाक दाबून तोंड उघडलं आणि तोंडाने श्वास दिला. त्यानंतर तिने डोळे उघडले. त्यानंतर माझ्या वडिलांच्या आणि आमच्या एका शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. ती दोन दिवस रुग्णालयात होती. तिला शनिवारी डिस्चार्ज जेण्यात आला, असंही निधीने सांगितलं.

करोनाने मृत्यू झालेला दोन वर्षांनी परतला, मग कुटुंबीयांनी कोणावर अंत्यसंस्कार केले?
पाण्याच्या समस्येमुळं सोसायटीतील स्विमिंग पूल बऱ्याच कालावधीपासून बंद होता. मात्र, उन्हाळा वाढल्यामुळं आम्ही नुकताच पूल सुरु केला होता. ही घटना घडली तेव्हा नुकताच पूल सुरु केल्यामुळं तिथे सिक्युरिटी गार्ड नव्हते तसंच, आजूबाजूला माणसंही कमी होते, असं सोसायटीच्या सेक्रेटरींना म्हटलं आहे.

ढोल ताशांचा गजर, घोड्यावरुन मिरवणूक; महाराष्ट्र केसरी उपविजेती वैष्णवी पाटीलची दणक्यात एंट्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here