सोन्या आणि चांदीचा आजचा दर
आजच्या व्यवहार सत्रात सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली असून दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ६० हजार २८० रुपये प्रति ग्रॅम तर चांदीचा भाव ७५,७३० रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव ४० रुपये प्रतितोळा तर चांदीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, शनिवारी (२२ एप्रिल) अक्षय्य तृतीयेच्या आधी आणि उन्हाळ्यात लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांच्या जोरदार मागणीमुळे घरगुती बाजारात सोन्याचे दर जास्त राहण्याची शक्यता आहे.
फ्युचर्स ट्रेडिंगमधील वाटचाल
फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोमवारी एमसीएक्सवर सोने ६० हजार ३८५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. तर चांदीचा भाव ७५,५५७ रुपयांवर पोहोचला. सोन्यामध्ये ५६ रुपयांनी वाढ झाली तर चांदीची वाटचाल सपाट राहिली. दरम्यान, कॉमेक्सवर सोन्याचा भाव मागील बंदच्या तुलनेत ०.१% वाढून सुमारे $२,०१७.८० प्रति औंस झाला. दुसरीकडे, चांदी घसरणीसह २५.४२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
सोन्या-चांदीचा विक्रम
गेल्या आठवड्यात मौल्यवान सोन्याचे विक्रमी पातळीवर उडी घेतली. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ४८० रुपये वाढून ६१ हजार ७८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जो आतापर्यंतचा उच्चांक राहिला. दरम्यान, जागतिक बाजारातील घडामोडींमुळे किमती वाढत असून सोन्याची झळाळी वाढत आहे. दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे तर गेल्या सत्रात ४१० रुपयांनी वाढून ७७,५८० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा कल पाहिला, तर शुक्रवारी ते प्रति औंस $२,०४१ वर पोहोचला तर चांदीचा दरही वाढून $२५.८८ प्रति औंस या पातळीवर पोहोचला.