नवी दिल्ली :देशातील अब्जाधीशांच्या यादीत पुरुष उद्योगपतींबरोबरच महिला उद्योगपतींचीही संख्या मोठी आहे. ‘फोर्ब्ज इंडिया’ने गेल्या आठवड्यात देशातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून, यादीत नव्याने सोळा जणांची भर पडली आहे. पैकी तीन महिला आहेत. ‘फोर्ब्ज इंडिया’च्या यादीनुसार, देशातील सर्वांत श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल, रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, लीना तिवारी आणि विनोद राय गुप्ता यांचा समावेश होतो. यादीत नमूद केल्यानुसार, विनोद राय गुप्ता या देशातील चौथ्या सर्वांत श्रीमंत महिला ठरल्या आहेत.सावित्री जिंदाल ९४व्या स्थानी
‘फोर्ब्ज’च्या आकडेवारीनुसार, जिंदाल समूहाच्या अध्यक्ष सावित्री जिंदल या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला उद्योगपती आहेत. ७३वर्षीय सावित्री या देशातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती १७ अब्ज डॉलर (१.४३ लाख कोटी रु.) आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा ९४वा क्रमांक लागतो.

Rajiv Jain: संकटात अदानींना मदतीचा हात आता श्रीमंतांच्या यादीत घेतली उडी, जाणून घ्या बँक बॅलन्स
सात अब्ज डॉलरची मालकीण
रोहिका या दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत. ५६वर्षीय रोहिका यांची एकूण संपत्ती सात अब्ज डॉलर (५७,३८० कोटी रु.) आहे. रोहिका या कॉर्पोरेट जगतात स्वत:ची वेगळी ओळख टिकवून आगेत. त्या काही पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव असणारे दिवंगत पल्लोनजी मिस्त्री हे त्यांचे सासरे होत.

‘बिग बुल’ची अर्धांगिनी
‘बिग बुल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा यांचाही देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत चौथा क्रमांक आहे. ५९ वर्षीय रेखा यांची एकूण संपत्ती ५.१ अब्ज डॉलर (४१,८१३ कोटी रु.) आहे. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ‘टायटन’, ‘स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स’ आणि ‘मेट्रो’ या ब्रँडचा समावेश आहे.

Forbes Rich List: मुकेश अंबानी एक नंबर! दिग्गजांना मागे टाकून ‘फोर्ब्स’च्या यादीत अव्वल
कोण आहेत विनोद राय गुप्ता?
विनोद राय गुप्ता या ‘हॅवेल्स इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांच्या मातु:श्री आहेत. ‘फोर्ब्ज’च्या मते ७८ वर्षीय विनोद राय गुप्ता यांची एकूण संपत्ती ३.९ अब्ज डॉलर (३२ हजार कोटी रु.) असून, त्या देशातील चौथ्या सर्वांत श्रीमंत महिला उद्योगपती ठरल्या आहेत. ‘हॅवेल्स इंडिया’ची स्थापना १९५८मध्ये त्यांचे पती दिवंगत किमतराय गुप्ता यांनी केली होती. सध्या कंपनीची जबाबदारी अनिल गुप्ता सांभाळतात. ‘हॅवेल्स’ची स्थापना इलेक्ट्रिकल ट्रेडिंग व्यवसायासाठी झाली होती. कंपनी पंखे, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशिनची निर्मिती करते. ‘हॅवेल्स’चे देशात १४ प्रकल्प असून, पन्नासहून अधिक देशांत उत्पादनांची निर्यात केली जाते.

पाचवी सर्वांत श्रीमंत महिला
देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत महिला ठरण्याचा मान लीना तिवारी यांना मिळाला आहे. त्या ‘यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड’च्या अध्यक्ष आहेत. त्यांची एकूण संपत्ती २७,८७६ कोटी रुपये आहे.

शालेय शिक्षण अर्थवट सोडले, कधीकाळी कॉल सेंटरमध्ये काम; आता बनला तरुण भारतीय अब्जाधीश
पुण्याच्या अनु आगा दहाव्या
पुण्याच्या अनु आगा यांचा महिला अब्जाधीशांच्या यादीत दहावा क्रमांक आहे. त्यांची ‘थरमॅक्स’ ही कंपनी पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. त्या १९९६ ते २००४ पर्यंत कंपनीत कार्यरत होत्या. त्यांची एकूण संपत्ती १६,४०० कोटी रुपये आहे.

यांचाही समावेश…
देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत सहावे ते नववे स्थान अनुक्रमे स्मिता कृष्णा गोदरेज (वय ७२ वर्षे, एकूण संपत्ती : २२,९५८ कोटी रु.), फाल्गुनी नायर (वय ६० वर्षे, एकूण संपत्ती : २१,३१५ कोटी रु.), राधा वेम्बू (वय ५० वर्षे, एकूण संपत्ती : १८,०३६ कोटी रु.) आणि किरण मजूमदार शॉ (वय ७० वर्षे, एकूण संपत्ती : १७,२१७ कोटी रु.) यांनी पटकावले आहे.

‘माझ्या आईला फोर्ब्स काय असतं कळत नाही, पण लेकरू मोठं त्याचं समाधान आहे’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here