नवी दिल्ली :नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. पगारदार वर्गाला आयटीआर भरण्यासाठी फॉर्म १६ आवश्यक असतो, परंतु बर्याच बाबतीत लोक फॉर्म १६ शिवाय देखील आयकर रिटर्न भरू शकतात. फॉर्म १६ असा एक दस्तऐवज आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्याच्या संपूर्ण करपात्र उत्पन्नाचा हिशेब मिळू शकतो. काही कर्मचाऱ्यांचे वेतन करपात्र उत्पन्नात येत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा स्थितीत कंपनी त्यांच्यासाठी फॉर्म १६ जारी करत नाही. असे असल्यास तुम्ही फॉर्म १६ शिवाय देखील ITR भरू शकता.

फॉर्म १६ शिवाय आयटीआर कसा भरायचा?
जर तुमच्याकडे १६ नंबर फॉर्म नसेल तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे पण, जरा अवघड आहे. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतील, कारण आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाचा पुरावा हवा असतो. अशा स्थितीत तुमची सॅलरी स्लिप तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. यासह, तुम्हाला तुमच्या एकूण उत्पन्नाची आणि करपात्र उत्पन्नाची माहिती मिळते. तुमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही स्त्रोत नसल्यास, तुमचा पगार तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.

पॅनकार्ड नसेल तर FD गुंतवणुकीवर मोजावा लागेल दुप्पट कर, काय सांगतो इन्कम टॅक्सचा नियम
फॉर्म १६ म्हणजे काय?
पगारदार वर्गासाठी आयकर रिटर्न भरताना फॉर्म १६ अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये तुमच्या एकूण उत्पन्नाचा हिशोब दिलेला असतो. यावरून एखाद्या व्यक्तीने एकूण किती पैसे खर्च केले हे समजते. गेल्या आर्थिक वर्षात किती कर कापला गेला आणि TDSची माहितीही उपलब्ध असते, ज्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची माहितीही नोंदवली जाते. तुमच्या सॅलरी स्लिपनंतर हे दुसर महत्त्वाचे कागदपत्र आहे.

तुमची कंपनी तुमचा पगार आणि तुमची गुंतवणूक योजना यावर आधारित तुमचा कर मोजते, मग तो तुमच्या कर दायित्वानुसार TDS कापतो. सामान्यतः कंपनी तुमचा एकूण कर एकदाच नाही तर मासिक आधारावर कापतो. यामुळे एकाच वेळी कोणत्याही कर्मचाऱ्यावर जास्त भार पडत नाही.

नव्या कर प्रणालीत इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग अशाप्रकारे उत्पन्न करमुक्त करा, इतका वाचवाल पैसा!
ITR फॉर्म 26AS द्वारे दाखल करता येतो
तुमच्याकडे फॉर्म १६ उपलब्ध नसल्यास तुम्ही २६AS द्वारे तुमच्या TDS आणि TCS बद्दल माहिती मिळवू शकता. या फॉर्ममध्ये एका व्यक्तीच्या आगाऊ कर आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांची माहिती उपलब्ध असते. याशिवाय तुमच्याकडे सॅलरी स्लिप, HRA स्लिप, आयकर कलम ८०सी आणि ८०डी अंतर्गत गुंतवणुकीचा पुरावा इत्यादी असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा पुरावाही जमा करावा लागेल. यानंतर तुम्ही फॉर्म १६ शिवाय सहजपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता.

फॉर्म 26AS- कसा डाउनलोड करायचा

  • जर तुमचा पगार आयकर अंतर्गत येत नसेल पण तुम्हाला ITR फाइल करायचा असेल तर तुम्ही प्राप्तिकर वेबसाइटवरून फॉर्म 26AS डाउनलोड करू शकता.
  • यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या ई-फाइल पोर्टलवर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला My Account हा पर्याय दिसेल, View Form 26AS लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर, त्यात मूल्यांकन वर्ष निवडा आणि View Time वर क्लिक करा.
  • त्यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करा आणि हा फॉर्म डाउनलोड होईल.

परदेश दौरा केला? टॅक्स रिटर्नमध्ये लिहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here