पीडितेच्या तक्रारीनंतर तीन संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. बारकु उर्फ प्रविण बाळू पाटील, पप्पु उर्फ शुभम बापू पाटील (दोघे रा. सावखेडा तुर्क ता. पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (रा. सावखेडा होळ ता. पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत.
पीडिता पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात कामाला जात होती, त्या-त्या शेतात कामाला जाऊन बारकु उर्फ प्रवीण पाटील, पप्पु उर्फ शुभम बापू पाटील, पप्पू उर्फ भावश्या भाऊसाहेब वसंत पाटील यांनी पीडितेशी जवळीक साधल. त्यानंतर शेतातच वेगवेगळ्या ठिकाणी नेत कधी एकाने तर कधी दोघांनी तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले होते आणि दिला धमकी देत होते. हे कोणाला सांगू नको नाहीतर तुझा व्हिडिओ आम्ही केलेला आहे. तो व्हीडीओ सर्वांना दाखवून तुझी बदनामी करू, अशी धमकी भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील हा देत होता. धमकी देत गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून मुलीवर अत्याचार सुरू होते.
पीडितेचं पोट दुखत होतं, दवाखान्यात नेऊन तपासणी केली अन् आईला धक्काच बसला
पीडित मुलीच्या पोटात ७ ते ८ दिवसांपासून दुखत होते. त्यामुळे तिने याबाबत तिच्या आईला सांगितले. तिला आईने एरंडोल येथील एका खासगी डॉक्टरकडे ११ एप्रिलला तपासणीसाठी नेले. यावेळी पीडिता ही १६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. डॉक्टरने याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्रही दिले.
मुलीला सोबत घेत मग तिच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी पारोळा पोलिसांत पोक्सो, अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.