मुंबई : गेल्या काही वर्षात भारतासह जगभरात क्रिप्टो करन्सीची क्रेझ आणि व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला असून क्रिप्टोकरन्सीने मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. मात्र, गुंतवणुकीच्या कोणत्याही पद्धतीत पैसा ओतण्यापूर्वी सावधानी बाळगणे सोयीचे असते. शेअर बाजाराप्रमाणेच क्रिप्टो मालमत्तेमध्ये (असेट) व्यापार आणि गुंतवणूक करणे धोकादायक आहे. विशेषत: जे या क्षेत्रात नवीन आहेत त्यांच्याकडून काही ना काही चूक होऊ शकते. अशा स्थिती जर तुम्हाला मार्केटप्रमाणे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातूनही नफा मिळवायचा असेल तर काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे.ट्रेडिंग खर्चावर लक्ष ठेवाएखादा व्यापारी एका दिवसात जितक्या वेळा व्यापार करतो, त्याला एक्सचेंजला व्यवहार शुल्क द्यावे लागते. तसेच एक्सचेंज वेळोवेळी शुल्कात वाढही करू शकते. अशा स्थितीत तुमच्यासाठी ट्रेडिंग खर्चावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे तुमचा नफा कमी होऊ शकतो.लीव्हरेज्ड ट्रेडिंग टाळाविशेषत: नवख्या गुंतवणूकदारांसाठी लीव्हरेज्ड ट्रेडिंग टाळणे महत्त्वाचे आहे. Zebpay च्या मते, लीव्हरेज्ड ट्रेडिंग एक अशी पद्धत आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त परतावा मिळतो. पण नफ्याप्रमाणे तोटाही अनेक पटींनी होऊ शकतो. परिणामी एका चुकीच्या व्यवहारामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.ट्रेडिंग धोरणाशिवाय गुंतवणूक करू नकातसेच गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे एक धोरण निश्चित असले पाहिजे. कारण स्ट्रॅटेजी आधीच बनवली असेल तर कोणते टोकन निवडायचे, कधी विकत घ्यायचे आणि कधी विकायचे याची सोय तुम्हाला मिळते. तसेच तुम्ही कोणत्याही रणनीतीशिवाय गुंतवणूक केल्यास आपण या गोष्टींची अचूक गणना करू शकणार नाही.निर्णय कसा घ्यावाकोणतीही व्यक्ती गुंतवणुकीवर आर्थिक तोटा सहन करू इच्छित नाही. पण जर तोटा होत असेल तर गुंतवणुकीवर पैसा गमावू इच्छित नाही. पण जर तोटा होत असेल तर, एका ट्रेडमधील तोट्याचा निर्णय तुमच्या इतर ट्रेडवर परिणाम करणार नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. तुमचे सर्व व्यवहार निर्णय स्वतंत्र राहू द्यात.ट्रॅकिंग खूप महत्वाचेजर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा मागोवा घेत नसाल तर तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. कारण म्हणजे जर तुम्ही गुंतवणुकीमध्ये तोटा करत असाल आणि तुम्ही त्यावर सतत लक्ष ठेवत नसाल तर तुमचा तोटा कालांतराने वाढत जाईल.(नोट: क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जोखीम असते, त्यामुळे स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करा. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचे मत समजून घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here