का घाबरले शास्त्रज्ञ, CSZ म्हणजे काय?
पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेल्या फॉल्ट लाईनवर शास्त्रज्ञांना मोठी छिद्र पडल्याचे पाहायला मिळाले. ज्यातून विचित्र गरम द्रव बाहेर पडत आहेत. कारण हे CSZ चं हे ठिकाण आहे. जिथे पृथ्वीच्या आतमध्ये २ प्लेट्स एकमेकांना भिडतात. म्हणूनच शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की गळती होणारा द्रव हा प्लेट्सवर नियंत्रण ठेवणार असू शकतो. लाईनवर पाण्याचे तापमान ३०० ते ५०० च्या जवळपास आहे. ही गळती अशी सुरू राहिली तर प्लेट्स नियंत्रित होऊ शकतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे. हे तीव्र भूकंपाचे कारण असू शकते. हा भूकंप त्सुनामी बनवून मोठा विनाश घडवू शकतो.
समुद्र सपाटीपासून एक मैल खाली गळती…
वॉशिंग्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञ इव्हान सॉलोमन यांच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या तळाच्या खाली असलेल्या गळतीलाच पायथियाचे ओएसिस म्हणतात. या प्रकारची गळती समुद्रात इतर ठिकाणी होऊ शकते. ही बाब अतिशय भीतीदाय असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. या संशोधनातील सहाय्यक प्राध्यापक टेबोरा यांच्यामते ही गळती जमिनीच्या आतील प्लेट्समधून होत असल्याची शक्यता आहे.
आग आणि पाणी
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी समुद्रामध्ये बुडबुडे उडताना पाहिले, तेव्हा त्यांचा विश्वास होता की मिथेन वायूमुळे असं होत असेल. परंतु, त्याचा अंदाज चुकीचा ठरला. जेव्हा तो समुद्राच्या तळाशी गेला तेव्हा त्याला ते पाणी बाहेर येत असल्याचे दिसले. अगदी आधीच्या कुंडासारखं वाटले. यापूर्वी अशी कोणती घटना समोर आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यावर मोठ्या भूकंपाचे लक्षण असू शकते. ज्यामुळे पुढे भविष्यात पृथ्वीलाही मोठा धोका होऊ शकतो.