सचिननेही लेकासाठी खास ट्विट केलं आहे. ‘अर्जुन रविवारी एक क्रिकेटर म्हणून त्याच्या या प्रवासात एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे. तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाबद्दल आवड असणारा मी, तुदेखील तुझ्या खेळाला नेहमी सन्मान देशील आणि खेळही तुझ्यावर तितकंच प्रेम करेल. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तु मोठी मेहनत घेतली आहे. यापुढेही तु अशीच मेहनत घेशील याची मला खात्री आहे. तुझ्या या प्रवासाची ही सुंदर सुरुवात आहे’ असं म्हणत सचिनने लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकर शनिवारी टीमसह अभ्याससत्र आणि त्यानंतर रविवारी मॅचआधी ड्रेसिंग रुममध्ये हजर होता. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात सचिन आणि अर्जुन तेंडुलकर मॅच खेळणाऱ्या बाप-लेकाची पहिली जोडी आहे. हे दोघं एकाच संघातून खेळतील अशी शक्यताही नाकारता येत नाही.
अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण आणि बाप लेकाचा अजब योगायोग
सचिनने २००८ ते २०१३ अशी सहा वर्ष मुंबई इंडियन्ससाठी प्रतिनिधित्व केलं. पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा २०२१ रोजी अर्जुन तेंडुलकरवर २० लाख रुपयांची बोली लावली होती. वानखेडे स्टेडियममध्ये अर्जुन आणि मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड आहे. परंतु घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईच्या टीममध्ये जागा न मिळाल्याने २०२२ पासून अर्जुन गोव्याचं प्रतिनिधित्व करत आहे.