अहमदाबाद:काहीच दिवसांपूर्वी एका पोलिसाने दहावीच्या परीक्षेदरम्यान एका मुलीला योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा गुजरातमधील वडोदरा पोलिसांनी आपल्या कामाचा आदर्श घडवून आणला आहे. एका विद्यार्थिनीच्या गाडीचा अपघात झाला. तेव्हा महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तिची मदत केली. कार चालवणाऱ्या विद्यार्थिनीला परीक्षेसाठी वडोदरा येथे जायचे होते. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. यामुळे विद्यार्थिनीला टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा देता आली आणि तिचं शैक्षणिक नुकसान होता होता वाचलं.कठीण प्रसंगी या विद्यार्थिनीला मदत करुन तिला योग्य वेळी परीक्षा केंद्रावर पोहोचवणाऱ्या पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांमुळे परीक्षा देऊ शकलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. ९ एप्रिल रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. कच्छ पोलिसांच्या एका पीआयने विद्यार्थिनीला योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचवून सर्वांचीच मनं जिंकली. तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वडिलांनी चुकीच्या केंद्रावर सोडलं, पेपरला १५ मिनिटं; निशाला काही कळेना, तेवढ्यात तो आला…
पीसीआरद्वारे परीक्षा केंद्रावर पोहोचवले

गुजरातमध्ये रविवारी TET परीक्षा घेण्यात आली. पंचमहाल जिल्ह्यातील कालेल तालुक्यातील डेरोळ येथे राहणारी विद्यार्थिनी परीक्षेसाठी कारमधून निघाली होतू. गायत्री वलंदा नावाती विद्यार्थिनी वडोदरा येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी जात होती. या विद्यार्थिनीची कार तरसाली बायपासवर आली असता एका हॉटेलजवळ ट्रेलर आणि कारची धडक झाली.

अंध दाम्पत्याचं गाऱ्हाणं सोनू सूदनं ऐकलं; घराचं स्वप्न केलं पूर्ण; एका फोनवर मदतीचा हात

पीसीआर व्हॅनमधून वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचवलं

तेव्हा, महामार्गावर पेट्रोलिंग करत असलेली वडोदरा पोलिसांची जीप घटनास्थळी पोहोचली. तपासादरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांना समजले की, कारमधील विद्यार्थिनीला मकरपुरा येथील न्यू एरा स्कूलमध्ये टीईटी परीक्षेसाठी जायचे आहे. त्यानंतर पोलिसांनी व्यवस्था करत तिला पीसीआर व्हॅनमधून वेळेवर न्यू एरा स्कूल या परीक्षा केंद्रावर पोहोचवले.

गायत्रीने मानले पोलिसांचे आभार

याबाबत बोलताना गायत्रीने सांगितलं की, कार ट्रेलरवर आदळल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मला गाडीतून बाहेर काढले आणि त्यांनी मला परीक्षा केंद्रावर नेले. पोलिसांच्या कारवाईने मी खूप खूश आहे. धडक देणाऱ्या चालकाला पोलीस पकडतील, अशी अपेक्षा आहे.

पोलिसांच्या मदतीने परीक्षा देण्यात यशस्वी झालेल्या पंचमहाल जिल्ह्यातील गायत्री वलंदाने एका व्हिडिओ संदेशाद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. या व्हिडिओ मेसेजमध्ये गायत्रीने पोलिसांचे आभार मानले आहेत. गायत्रीने पोलिसांचे कौतुक करताना सांगितले की, कार ट्रेलरला धडकल्यानंतर ती खूप घाबरली होती आणि तिला वाटत होते की आता ती परीक्षा देऊ शकणार नाही. गायत्री म्हणाली की ती पोलिसांच्या कारवाईवर खूप खूश आहे. तिच्या गाडीला धडक देणाऱ्या ट्रेलर चालकाला पोलीस पकडतील, अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. पोलिसांच्या मदतीने ती परीक्षेला बसू शकली. हे सांगताना ती भावूक झाली होती.

आईचे अश्रू थांबेनात; वडील म्हणतात- आमचा काहीही संबंध नाही; अतिक अहमदला संपवणारा लवलेश कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here