आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना युएईमध्ये नेण्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या दोन करोना चाचण्या घेण्यात येणार आहे. जर या दोन्ही चाचण्यांमध्ये खेळाडू निगेटीव्ह सापडला तरच त्याला युएईला जाता येणार आहे. पण त्यावेळ किंवा युएईमध्ये पोहोचल्यावर खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर बीसीसीआयचे धाबे दणाणले जाऊ शकतात. कारण आयपीएल जरी भारताची असली तरी ती युएईमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे युएईच्या नियमांनुसार बीसीसीआयला वागावे लागेल. जर युएईमध्ये करोना पॉझिटीव्ह खेळाडू आढळला आणि त्यांच्या सरकारने जर आयपीएल रद्द करायला सांगितली तर बीसीसीआयकडे कोणताच पर्याय उपलब्ध नसेल.
आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी सांगितले की, ” आमच्यासाठी खेळाडू आणि त्यांची प्रकृती सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे खेळाडूंची काळजी घेतली जाईल, त्याचबरोबर त्यांच्या योग्य त्या वैद्यकीय चाचण्याही करण्यात येणार आहेत. पण जर आयपीएल सुरु असताना एक जरी करोना पॉझिटीव्हची केस समोर आली तर ते फार भारी पडू शकते. आयपीएल सुरु असताना जर करोना पॉझिटीव्हची एखदी केस जरी समोर आली तरी आयपीएल रद्द केले जाऊ शकते.”
आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना युएईमध्ये नेण्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या दोन करोना चाचण्या घेण्यात येणार आहे. जर या दोन्ही चाचण्यांमध्ये खेळाडू निगेटीव्ह सापडला तरच त्याला युएईला जाता येणार आहे. आयपीएल ही जवळपास दोन महिने चालणार आहे. पण खेळाडूंना आयपीएल सुरु असताना मात्र प्रत्येक पाच दिवसांनी करोना चाचणी करावी लागणार आहे. पाच दिवसांमध्ये एखादा संघ एक किंवा दोन सामने खेळणार आहे. या सामन्यांमध्ये जर खेळाडू करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला तर त्यालाही करोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे आयपीएल सुरु असतानाही खेळाडूंना प्रत्येक पाच दिवसांनी करोनाची चाचणी करावी लागणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.