कोल्हापूरः कोल्हापूरः कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याची महत्त्वाची भिंत मंगळवारी ढासळली. गावाकडे तोंड करून असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकादायक झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी खासदार छत्रपती संभाजी यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली.

बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. याची दखल घेत संभाजी राजेंनी तातडीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली असून ‘स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत,’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

‘केंद्रीय पुरातत्व खात्याला तातडीने एस्टीमेट तयार करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री पटेल यांनी दिले आहेत. तसंच, पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत, अशा कडक सूचना अधिराऱ्यांना केल्या आहेत.

ऐतिहासिक महत्त्व असलेला जलदुर्ग

मराठी साम्राज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची ही दक्षिणेकडील आरमारी राजधानी होती. या किल्ल्याने तब्बल १३ लढाया घनघोर पणे लढल्या आहेत. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आहे. अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे विजयदुर्गची भिंत कोसळली. याची माहिती किल्ल्यावरील कर्मचारी रामदास आणि साशंक शिरवाडकर यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकारी यांना दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर विजयदुर्गच्या एका बुरुजाची पडझड झाल्याचं लक्षात आल्यानंतर या पोस्टची तात्काळ दखल घेत त्यांनी पुरातत्व खात्याला याबाबत माहिती कळवण्याचे व पडझड रोखण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या. किल्ल्याची डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here