म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :तरूणाईमध्ये ई-सिगारेटचे प्रचंड व्यसन आहे. लोअर परळ येथील तरूणीने ॲानलाइन घरपोच ई-सिगारेट मागविण्यासाठी एका मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. समोरील व्यक्तीने एका सिगारेटचे दीड हजार रूपये पाठविण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून दोन लाख रूपये परस्पर वळविले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.काय आहे प्रकरण?

ई-सिगारेटचे व्यसन शरीरासाठी घातक असल्याने त्याची विक्री करण्यास मनाई आहे. असे असताना ई-सिगारेटची ॲानलाइन बेकायदा विक्री केली जाते. लोअर परळ येथील २६ वर्षाच्या आकांक्षा (बदलेलेले नाव) हिने ई-सिगारेट मागविण्यासाठी गुगलवरून एक मोबाइल क्रमांक मिळवला. त्यावर संपर्क करताच समोरील व्यक्तीने दीड हजार रूपये होतील, असे सांगितले. आकांक्षा हिने त्याने पाठवलेला क्यू आर कोड स्कॅन करून दीड हजार पाठवले. काही वेळाने कुरीयर कंपनीतील प्रतिनिधीचा तिला फोन आला. त्याने साडेतीन हजार रूपये अमानत रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. सिगारेट पोहोचताच ही अमानत रक्कमही परत केली जाईल, असे सांगितले. आकांक्षाने ही रक्कमही पाठवली.

सिगारेट घरी आली नाही म्हणून आकांक्षाने कुरिअर प्रतिनिधीशी संपर्क केला असता त्याने अमानत रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. काहीतरी तांत्रिक गडबड असल्याचे कारण पुढे करून पुन्हा तितकीच रक्कम पाठविण्यास सांगितले. आकांक्षा हिने पुन्हा तेवढी रक्कम पाठवली. दिलेल्या क्यू आर कोडवर पैसे मिळत नसल्याने तिला दुसरे बँक खाते देऊन त्यावर रक्कम पाठविण्यास सांगितले. त्या ठिकाणीही पैसे येत नसल्याचे तसेच इतर वेगवेगळी कारणे सांगून आकांक्षा हिच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे दोन लाख रूपये उकळण्यात आले.

भाऊ कस्टममध्ये कामाला, पकडलेलं सोनं कमी किमतीत देण्याचं आमिष दाखवलं, महिलेनं २ कोटी दिले तिथेच चुकलं, अखेर…
फसवणूक होत असल्याचे कळताच आकांक्षा हिने खरेदी रद्द करण्यास सांगितले. त्यासाठीही आणखी पैशाची मागणी केली जाऊ लागल्याने आकांक्षा हिने ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here