आज सोन्या-चांदीचा भाव काय?
१८ एप्रिल २०२३ रोजी देशात सोन्याचे दर कमी झाले. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची भारतात आज किंमत ५५ हजार ८५० रुपये आहे, जी काल ५५,९४० रुपये होती. तसेच गुडरिटर्न्सवर उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार आज भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१ हजार ०३० रुपयांच्या तुलनेत ६० हजार ९२० रुपयांवर घसरली आहे. अलीकडेच अमेरिकन डॉलरची ताकद वाढल्याने आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यानंतर मौल्यवान धातूंच्या व्यवहारावर दबाव वाढत असून विश्लेषकांच्या मते, आजच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दोन्ही किमती अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
MCX वर सोने-चांदीची किंमत
कालच्या सत्रात भारतीय बाजारात संमिश्र ट्रेंडनंतर आज मंगळवार, १८ एप्रिल रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दोन्ही किंमती किरकोळ वाढीसह व्यवहार करत आहे. ५ जून २०२३ रोजी मॅक्युअर होणाऱ्या सोने वायदे MCX वर रु. १०५ किंवा ०.१७% वाढून ६०,३३९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. तर ५ मे २०२३ रोजी परिपक्व होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्समध्येही ७५ रुपये किंवा ०.१०% किरकोळ वाढ झाली आणि किंमत ७४,९३६ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते
खरेदीआधी सोन्याची शुद्धता तपासून घ्या…
दरम्यान, सोन्याचे बिस्कीट किंवा दागिने खरेदीआधी सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक ॲप बनवले आहे. BIS केअर ॲपद्वारे सोन्याची शुद्धता तपासली जाऊ शकते. तसेच या ॲपद्वारे ग्राहक फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित तक्रारही करू शकतात.