अशा स्थितीत जर तुम्ही देखील नवीन कर प्रणाली निवडण्याचा विचार करत असाल तर खालील काही फायदे आहेत, ज्याच्याबद्दल कदाचितच लोकांना माहित असेल. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही कर विवरणपत्र भरण्यापूर्वी कोणतीही एक कर व्यवस्था निवडू शकता. चला तर मग जाणून घेऊया नवीन कर प्रणालीतील चार प्रमुख बदलांबद्दल.
नवीन कर स्लॅब
अधिकाधिक लोकांनी नवीन कर प्रणालीकडे वळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे नवीन कर प्रणालीमध्ये कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रणालीमध्ये ६ कर स्लॅब असून यामध्ये तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यानंतर प्रत्येक ३ लाख रुपयांच्या वाढीवर ५% कर भरावा लागणार.
कर सूट वाढली
नव्या कर प्रणालीत मूळ कर सूट मर्यादा ३ लाख करण्यात आली असून यापूर्वी ती २.५० लाख रुपये होती. म्हणजे या कर व्यवस्थेत टॅक्स भरल्यास वार्षिक तीन लाख रुपये कमावणारे लोक आता आयकर भरण्याच्या चिंतेतून मुक्त झाले आहेत. तर जुन्या कर प्रणालीत ही सूट फक्त २.५० लाख रुपयांपर्यंत आहे.
७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
नव्या कर प्रणालीत तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर स्लॅब मधून वगळण्यात आले असले तरी जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न ७ लाखांपर्यंत पोहोचत नसले तरी त्याला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. इतकंच नाही तर मानक कपात जोडल्यास ७.५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कर मुक्त आहे. मात्र, यापेक्षा जास्त कमाईवर टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. म्हणजे ७.५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही पण ७.५ लाखांनंतर स्लॅबनुसार कर गणना सुरु होईल.
अर्थमंत्री भर सभागृहात ‘जुनी राजकीय वाहनं’ म्हणाल्या अन् सभागृहात एकच हशा पिकला!