जळगाव :अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून राजकीय भूकंपच नाही तर महाभूकंप होणार, असा दावा करू मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण सुरू आहे. भाजप शिवसेनेच्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होईल. आणि अजित पवार यांच्या पक्षांतराच्या नुसत्या चर्चा नसून या सर्व चर्चांमध्ये तथ्य असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

अजित दादा हा दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. राज्यात सध्या जोरदार विकास सुरू आहे. त्यामुळे अजित पवार हे विकासाच्या बाजूने असतील. शिवसेना भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आणि आमदारांचा गट आल्यास आगामी काळात राज्यातील चित्र वेगळं असेल, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

‘असं म्हणतात की शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं’

शरद पवार जरी म्हणत असले या नुसत्या चर्चा आहेत. मात्र, शरद पवार यांच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवतं? शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं, असं म्हणतात. मी शरद पवार यांच्यावर टीका करणार नाही, कारण ते मोठे नेते आहेत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला आहे.

अजित पवार यांची पक्षातच कोंडी, ‘टोकाचा निर्णय’ घेण्यास भाग पाडण्याची खेळी?

‘एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात, त्यावेळी काही ना काही आखलेल असतं, सपेन्स वाढला’

राज्यात ४० चा आकडा लकी आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असतील असे संकेतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात. त्यावेळी काही ना काही आखलेलं असतं. अजित पवार यांचं पक्षांतर अटळ आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितलं. अजित दादा पवार यांना नेमकं कोणतं पद मिळेल? असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. जोपर्यंत पक्षांतर होत नाही, तोपर्यंत बोलणं उचित ठरणार नाही, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार? आमदारांचा गट गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एकमेव आमदारही मुंबईत दाखल, चर्चांना उधाण

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षांतर करत असल्याच्या तसेच त्यांच्या सोबत ४० आमदार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटीलही मुंबईत दाखल झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले अनिल भाईदास पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. ‘दवाखान्याच्या कामासाठी मुंबईत आलोय. अजित पवार यांच्या बैठकीला मी आलेलो नव्हतो. मात्र मी अजित पवार यांची भेट घेणार आहे’, असं आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, अजित पवार यांच्या सोबत जे ४० आमदार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यात आमदार अनिल पाटीलही आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here