घरभाडे तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न देते. परंतु यासंबंधीच्या नियमांची माहिती नसलेल्या लोकांनाही नुकसान सोसावे लागते. अनेक वेळा मालमत्तेचा मालक भाडेतत्वावर देऊनही वर्षानुवर्षे त्याची विचारपूस करत नाही. त्यांना फक्त दर महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या भाड्याशी मतलब असते. हा निष्काळजीपणा आहे आणि तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मालमत्ता कायद्यानुसार जर एखादा भाडेकरू १२ वर्षे सतत तुमच्या घरात भाडेकरू म्हणून राहिल्यास त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. त्याच्या अटी खूप कठीण असल्या तरी तुमची मालमत्ता विवादात सापडू शकते.
प्रतिकूल ताबा नियम
ब्रिटिश काळात प्रतिकूल ताब्याचा कायदा करण्यात आला होता. सोप्या शब्दात बोलायचे तर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा कायदा आहे. मात्र, वर दिलेल्या परिस्थितीत ते स्वीकारले जाते. १२ वर्षांचा कायदा सरकारी मालमत्तेला लागू होत नाही. फार जुन्या कायद्यानुसार केले जाते, त्यामुळे अनेक वेळा मालकांना त्यांची मालमत्ता गमवावी लागते. बऱ्याच काळासाठी भाड्याने राहणारे लोक या कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे घरमालकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
कोणत्या परिस्थितीत मान्यता मिळते?
जर मालमत्तेवर शांतीपूर्ण पद्धतीने ताबा घेतला असेल आणि जमीनमालकालाही याची माहिती असेल तर मालमत्तेच्या मालकीवर प्रतिकूल ताब्याचा दावा केला जाऊ शकतो. यातील सर्वात मोठा घटक म्हणजे १२ वर्षांच्या कालावधीत जमीन मालकाने त्या ताब्याबाबत कोणताही आक्षेप घेतला नसावा. म्हणजेच मालमत्तेचा ताबा सातत्यपूर्ण होता आणि त्यात कोणताही खंड पडला नाही हे सिद्ध करणे आवश्यक आहे. अतिक्रमणकर्त्याला प्रॉपर्टी डीड, कर पावती, वीज किंवा पाण्याचे बिल, साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र इत्यादी देखील आवश्यक आहेत.
बचाव कसा करायचा
अशा परिस्थितीपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे घर कोणालाही भाड्याने देण्यापूर्वी भाडे करार करून घ्या. घरभाडे करार १ महिन्यांसाठी असतो आणि म्हणून दर ११ महिन्यांनी त्याचे नूतनीकरण करावे लागेल, जे मालमत्तेचा सतत ताबा मिळणे खंडित करत. दुसरं म्हणजे तुम्ही वेळोवेळी भाडेकरू बदलू शकता. तसेच तुमच्या मालमत्तेवर कोणतेही बेकायदेशीर अतिक्रमण होणार नाहीना, यावर तुम्ही नेहमी लक्ष ठेवा. एखाद्यावर विश्वास ठेवल्याने आणि मालमत्ता पडून राहिल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.