मुंबई:विराट कोहली आणि सौरव गांगुली हा सध्या चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. आरसीबी आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील काही प्रसंगांनंतर आता या दोघांमधील या मतभेदांचे पडसाद आता सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याचे सिनियर आणि माजी बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी दोघे एकमेकांना फॉलो करत होते. पण आता विराट कोहलीने हे पाऊल उचलल्यानंतर सौरव गांगुली यांनी त्याच्याच भाषेत उत्तर दिले.दिल्ली-बेंगळुरू सामन्यानंतर कोहली आणि गांगुली ना एकमेकांशी बोलले ना त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. त्यांच्यातील या प्रसंगांचा चाहते कर्णधारपदासंबंधित झालेल्या वादाशी संदर्भ जोडत आहेत. टी-२० विश्वचषक २०२१ नंतर झालेल्या वादामुळे कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले, तर त्यापूर्वी त्याने टी-२० मधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती आणि BCCI कडून वनडेमधूनही त्याला हटवण्यात आले.

IPL मॅच पाहताना चिमुकली अचानक ढसाढसा रडू लागली; आईने शेअर केला भावूक व्हिडिओ
या संपूर्ण प्रकरणात सौरव गांगुलीची महत्त्वाची भूमिका असल्याचे कोहलीच्या चाहत्यांचे मत आहे. मात्र, गांगुलीने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले. कोहलीने सौरव गांगुली यांना इंस्टाग्राम अनफॉलो केले. तर आता सौरव गांगुलीने सुद्धा विराट कोहलीला अनफॉलो केले आहे. आरसीबी आणि दिल्लीच्या सामन्यापूर्वी हे दोघेही एकमेकांना फॉलो करत होते पण आता त्यांच्यातील मतभेद या सामन्यात दिसून आल्याने कोहलीच्या या वागण्याला आता गांगुलींनी ही प्रत्युत्तर दिले आहे.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

सोमवारी झालेल्या सामन्यात कोहली अडचणीत सापडला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कोहलीला त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघाला चेन्नईच्या संघाने घरच्या मैदानावर पराभूत केले. डेव्हॉन कॉनवे (४५ चेंडूत ८३) आणि शिवम दुबे (२७ चेंडूत ५२) यांच्या अर्धशतकांनी सीएसकेला ६ बाद २२६ धावसंख्येपर्यंत पोहोचले. ग्लेन मॅक्सवेल (३६ चेंडूत ७६) आणि फाफ डू प्लेसिस (३३ चेंडूत ६३) यांच्या झंझावाती खेळीनंतरही सीएसकेच्या गोलंदाजांनी आरसीबीला लक्ष्य गाठू दिले नाही आणि आपल्या संघाला आठ धावांनी विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here