पंतप्रधान जन धन योजनेच्या (PMJDY) वेबसाइटनुसार, ५ एप्रिल २०२३ पर्यंत या योजनेत एकूण ४८.७० कोटी लोकांनी खाती उघडली असून ३२.९६ कोटी RuPay डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागात ३२.४८ कोटी खाती उघडण्यात आली आहेत.
१० हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा
प्रधानमंत्री जन धन योजनेमध्ये खातेदाराला सरकारकडून १०,००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळतो. म्हणजे जर तुमच्या खात्यात शून्य रक्कम शिल्लक राहिली असेल तरीही तुम्ही १०,००० रुपये काढू शकता. अशा स्थितीत जर तुम्हाला जन धन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी या योजनेअंतर्गत सर्वप्रथम बँकेत खाते उघडावे लागेल. ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत तुम्हाला १०,००० रुपये एक कर्ज म्हणून दिले जातील, पण यासाठी काही अटी आहेत.
जन धन योजनेतील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी अटी
- बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते किमान सहा महिने सक्रिय असले पाहिजे
- कुटुंबातील कमावत्या सदस्याला १०,००० दिले जातील, ज्यामध्ये महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- तुमच्या खात्यात सतत पैसे जमा होत राहिले.
- खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
- आरबीआयच्या निर्देशानुसार तुमचे इतर कोणत्याही बँकेत/शाखेत खाते नसावे
- १८ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना ही सुविधा मिळते.
२,००० रुपये अटीशिवाय
या योजनेची आणखी एक गोष्ट म्हणजे १०,००० रुपयांच्या ओव्हर ड्राफ्टसाठी अनेक नियम आहेत, परंतु तुम्ही कोणत्याही अटीशिवाय २००० रुपये काढू शकता. योजनेशी संबंधित सर्व माहिती तुम्हीया लिंकवरमिळवू शकता.
या योजनांचा लाभ मिळेल
या योजनेचे खातेदार इतर अनेक योजनांसाठी पात्र आहेत
- थेट लाभ हस्तांतरण
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
- अटल पेन्शन योजना
- मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी बँक योजना
बँकांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?