प्रयागराज :उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन जणांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. प्रयागराज या घटनेनं हादरलं होतं. ते प्रकरण ताजं असतानाच अतिक अहमद याचा वकील ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या भागात देशी बॉम्ब फेकण्यात आला. या स्फोटात कसलिही जीवितहानी झालेली नाही.

प्रयागराजमधील कटरा गोबर गली भागात स्फोट करण्यात आला. कर्नलगंज पोलीस या घटनेप्रकरणी तपास करत आहेत. हा बॉम्ब दहशत पसरवण्याच्या उद्देशानं फेकण्यात आला होता हे स्पष्ट झालं आहे.

अतिक आणि अहमद अशरफची १५ एप्रिलला हत्या

अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांना प्रयागराज पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं होतं. त्यावेळी अतिक अहमद आणि अशरफ अहमद माध्यमांच्या प्रश्नांची उत्तर देत होते. त्याचवेळी तीन मारेकऱ्यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे दहानंतर घडली. अरुण मौर्य, सनी पुराने आणि लवलेश तिवारी या तिघांनी अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.

एटीएम फोडण्यासाठी आरोपी विमानाने पंजाबमधून नागपुरात, मात्र ऐनवेळी घोळ झाला अन् प्लॅन फसला!

अतिकची दोन मुलं तुरुंगात, पत्नी फरार

अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीनवर ४ गुन्हे दाखल आहेत. उमेश पाल हत्याकांडात ती आरोपी आहे. उमेश पाल हत्या प्रकरणानंतर ती फरार आहे. पोलिसांनी शाइस्ता परवीनवर बक्षीस जाहीर केलं आहे. अतिक अहमदचा मोठा मुलगा मोहम्मद उमर याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. सीबीआयनं २ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर त्यानं शरणागती पत्करली होती. तो सध्या लखनऊ तुरुंगात आहे.

महाराष्ट्रात भाजपला एकहाती सत्तेची सूत्रं मिळतील का? कीर्तिकरांचं इतिहास सांगत भविष्यावर भाष्य, म्हणाले शक्य..

अतिक अहमदचा दुसरा मुलगा मोहम्मद अली याच्यावर ६ गुन्हे दाखल आहेत. हत्येचा प्रयत्न आणि ५ कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल असून तो फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीस लावलं होतं. त्यानंतर ३१ जुलै २०२२ रोजी त्यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. तो सध्या नैनी सेंट्रल जेलमध्ये आहे.

RCB च्या मैदानात कोहलीपेक्षा धोनीचा जलवा, अनुष्काही प्रेमात पडली अन् तीन शब्दांत म्हणाली…

योगींची दहशत, एन्काऊंटरने थरकाप, कुख्यात गुंड अतिक अहमदही थरथरायला लागलाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here