बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंज बँगलोरदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये धमाकेदार सामना खेळला गेला. हजारो चाहत्यांच्या गर्दीत सोमवारी या सामन्यात ४४४ धावा झाल्या, तर ३३ षटकार आणि १२ विकेट घेण्यात आले. मॅचमध्ये चेन्नईने बँगलोरचा ८ धावांनी पराभव केला. या सामन्यावेळी अनेकजण धोनीची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक होते.पण, सामन्यावेळी चाहत्यांची निराशा झाली. धोनी शेवटी मैदानात उतरला आणि एका चेंडूत त्याने एक रन केला. धोनीची बॅटिंग पाहण्यासाठी, त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी हजारोंच्या गर्दीत एक पोस्टर दिसलं. त्या पोस्टरवर मी माझी बाईक केवळ धोनीला पाहण्यासाठी विकली असल्याचं लिहिलं होतं. तो व्यक्ती गोव्याहून मॅच पाहण्यासाठी आला होता. हा पोस्टर बॉय काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

छोटी-मोठी नाटकं ते थेट आयपीएलचा मराठी निवेदक; कोल्हापूरकर भावाचा दमदार प्रवास

हा पोस्टर बॉय नेमका कोण आहे आणि त्याने खरंच धोनीला पाहण्यासाठी त्याने बाईक विकली का याबाबत अधिक माहिती नाही. पण सध्या हा पोस्टर बॉय चर्चेत आहे. धोनीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंज बँगलोरमध्ये सोमवारी सामना झाला. धोनी अखेरच्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी तो केवळ तीन चेंडू खेळू शकेल हे सर्वांनाच माहित होतं. पण ज्यावेळी धोनी मैदानात आला तेव्हा अख्ख्या स्टेडियममध्ये धोनीच्याच नावाचा जयघोष होता. त्यातच हा पोस्टर बॉय उपस्थित होता.

क्रिकेटर्सचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे याआधीही असे अनेक पोस्टर समोर आले आहेत. याआधी एक चाहत्याने विराट जोपर्यंत शतक करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नसल्याचं पोस्टर लिहिलं होतं. अशा या पोस्टरवरुन चाहत्यांचं क्रिकेटप्रेम दिसून येतं.

सलग तिसऱ्या विजयासाठी रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय; आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर खेळणार का?

सोमवारी झालेला सामना अधिकच खास ठरला होता. दोन दिग्गज क्रिकेटर एक विराट रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळतो आणि दुसरा धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे. पण अनेक चाहत्यांसाठी हैराण करणारी बाब म्हणजे धोनीने एका चेंडूत केवळ एक रन केला, तर दुसरीकडे विराट कोहली ६ धावा करत आउट झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here