केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील लखनौ सुपर जायंट्स आणि धोनीचा सांग चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना ४ मे रोजी लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणार होता. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार आता हा सामना त्याच ठिकाणी एक दिवस आधी खेळवला जाणार आहे. म्हणजेच लखनौ आणि चेन्नईमधील हा सामना ३ मे रोजी होणार आहे. या बदलामागील मुख्य कारण म्हणजे स्थानिक निवडणूका. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचा विचार करता हा बदल करण्यात आला आहे.
वेळापत्रक का बदलले
आयपीएलने आपल्या रिलीजमध्ये लिहिले की, ‘आयपीएल २०२३ चा ४६ वा सामना जो ४ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार होता तो आता बदललेल्या वेळापत्रकानुसार ३ मे रोजी खेळवला जाईल. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
बदललेल्या वेळापत्रकामुळे ३ मे हा दिवस आता डबल हेडर डे असेल. चेन्नई आणि लखनौ दुपारी ३.३० वाजता आमनेसामने असणार आहेत, तर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे संघ संध्याकाळी ७.३० वाजता मैदानात उतरतील. चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्यांदाच लखनौच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे.