रत्नागिरी: येथे सलग ३९ वर्षे सेवा देणारे व निवृत्तीनंतरही पुढे आणखी ७ वर्षे वैद्यकीय सेवा बजावणारे प्रख्यात डॉक्टर दिलीप मोरे (६५) यांचे आज पहाटे कोविडशी झुंज देताना अकस्मात निधन झाले. त्यांच्यावर गेले १५ दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगी यांनाही संसर्गाची लागण झाल्याने तिघांवरही एकाचवेळी उपचार करण्यात येत होते. (Dr. due to )

वाचा:

जिल्ह्यासह तळकोकणात यांचा नावलौकीक होता. त्यांना जनरल प्रॅक्टीसचा दांडगा अनुभव होता. रोगनिदानात त्यांचा हातखंडा होता. डॉक्टरकी करताना त्यांनी सामाजिक बांधीलकीही जपली. जन सामान्यांचे आपले डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. डॉक्टरी पेशाला महत्त्व देताना त्याला व्यवसायी व बाजारीपणा त्यांनी कधीही आणला नव्हता.”रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या नितीने ते समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर मिळून मिसळून वागत होते. कोणी गोरगरीब असो अथवा श्रीमंतीचा थाट असणारा रुग्ण त्याच्यावर उपचार सेवा करताना डॉक्टर सर्वांचे अशा पद्धतीने ते त्यांना तपासत असायचे. त्यांनी कधीही उपचारासाठी पैसे मागितले नाहीत अथवा भरमसाठ फी घेतली नाही. रुग्णाला तपासल्यावर ते रुग्णांकडून नैमित्तिक फी सुद्धा घ्यायचे नाहीत. त्यांना कोणत्याही रुग्णालयाने उपचार वा निदानासाठी बोलावले किवा रुग्णांच्या नातेवाइकांनी बोलावले तर सर्व नियम पाळून ते तिथे दाखल व्हायचे व निदान आणि उपचार मोफत करायचे.

वाचा:

पोलीस, तुरुंगातील कैदी, मनोरुग्ण या सर्वांनाच डॉक्टर मोरे यांनी सेवा दिली. पोलीस कुटुंबातील डॉक्टर म्हणूनही त्यांचा नावलौकीक होता. रत्नागिरीतील प्रख्यात उद्योगपती दिवंगत एम. डी. नाईक यांच्या मुलाने रत्नागिरीत मच्छिमार वसाहत व सर्वसामन्यांसाठी एक रुग्णालय उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यासाठी मोरे यांना आग्रह होता. परंतु, डॉ. मोरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय येथील गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातच अखंड सेवा बजावली.

४४ नवजात बालकं व मातांना केले करोनामुक्त

करोना साथीने रत्नागिरीत शिरकाव केल्यानंतर सुरुवातीच्या काळात जिल्हा रुग्णालयाने अभूतपूर्व कामगिरी केली. केवळ १५ % डॉक्टर असतानाही करोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले. करोना बधितांची चाचणी घेण्याचे महत्त्वाचे काम रुग्णालयाने केले. दरदिवशी ९६ स्वॅब घेऊन ते पुणे येथे तपासणीला पाठवले जायचे. नंतर दररोजची स्वॅबसंख्या वाढल्याने पुणे व कोल्हापूरमधून तपासणी अहवाल मिळण्यावर मर्यादा आल्या. त्यातून अहवाल रखडू लागल्याने रुग्णावरील उपचारास विलंब होऊ लागला. त्याही स्थितीत अपुऱ्या साधन सामुग्रीत टेक्निशियन, कर्मचारी व डॉक्टर्सच्या साथीने डॉ. मोरे यांच्या टीमने रुग्णांना सर्वोत्तम उपचार दिले. सात दिवस करोना बाधितांवर उपचार केल्यानंतर पुढचे सात दिवस विलग राहण्याची गरज असते. मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे हे विलगीकरण डॉक्टर मोरे व त्याच्या सहकाऱ्यांना शक्य झाले नाही. काही दिवसांपूर्वीच डॉ.मोरे यांनी ४४ नवजात बालक व मातांची करोनाच्या विळख्यातून सुटका केली होती. मात्र ही रुग्णसेवा देत असतानाच नकळत त्यांना व त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी व मुलीला करोनाची लागण झाली आणि त्यातच डॉ. मोरे यांना प्राण गमवावे लागले.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here