म. टा. वृत्तसेवा, ठाणे :महामुंबई परिसरात उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे या मोसमातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कर्जतलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये ४४ तर याच तालुक्यातील मोठे महसुली गाव असणाऱ्या धसईमध्ये ४३ अंश तापमानाची नोंद झाली.ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही मंगळवारी तापमान चाळीशीपार पोहोचले होते. बदलापूर (४२.६), कल्याण (४२.८), डोंबिवली (४२.६), मुंब्रा (४२.३), ठाणे (४२.८), पनवेल (४२.८), नवी मुंबई (४१.८) तापमानाची नोंद झाली. मिरा रोड (३८.२), विरार (३८) येथेही चाळीसच्या जवळपास पारा होता. आज, बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहील. त्यानंतर उद्या, गुरुवारपासून तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज बदलापूर येथील हवामानतज्ज्ञ अभिषेक मोडक यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील तापमानाही चढेच

भारतीय हवामान विभागाने पश्चिम भारतात तापमानवाढीचा इशारा दिला होता. मध्य भारतात मंगळवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० ते ४४ अंशांदरम्यान होता. विदर्भात तर सर्वदूर पारा ४० अंशांच्या वर नोंदला गेला. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीहून २.३ अंशांनी अधिक होते. छत्रपती संभाजीनगर येथे ३९.८, बीड येथे ४१.६, कोल्हापूर येथे ३९.१, नांदेड येथे ३९.८, परभणी ४१.७, सांगली ३९.६, सातारा ३८.८, सोलापूर येथे ४१.८, उदगीर येथे ३९.५, नाशिक य़ेथे ३९.१, जळगाव येथे ४१.६ असा तापमानाचा पारा चढा होता.

ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, आगीदरम्यान वाहनांचा स्फोट, काही जण अडकल्याची भीती
मंगळवारचे तापमान

कर्जत : ४५ अंश

ठाणे, कल्याण : ४२.८ अंश

डोंबिवली : ४२.६ अंश
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ कायम राहणार; या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह कोसळणार
मुंबईकर झळांनी त्रस्त

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या आठवड्यातील पावसाळी वातावरण निवळल्यानंतर मुंबईत उन्हाचा पारा मंगळवारी ३७ अंशांच्या पुढे गेला. मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान होते. मंगळवारी हा पारा अचानकपणे ३.३ अंशांनी चढला. निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरण थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने उन्हाचा त्रास अधिक जाणवला. तसेच उष्ण झळाही तापदायक ठरल्या. मुंबईमध्ये सकाळपासूनच उन्हाच्या झळांची तीव्र जाणीव होऊ लागली होती. सांताक्रूझ येथे कमाल तापमान एकीएकी चढले मात्र शहरामध्ये सोमवारी नोंदल्या गेलेल्या ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानानंतर बुधवारी ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३६ अंशांच्या आसपास राहील असा अंदाज आहे. त्यानंतर २१ एप्रिलला त्यात पुन्हा थोडी घट होऊन हे तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान नोंदवले जाऊ शकेल. कोकण विभागात डहाणू केंद्रावर ३५.५, अलिबाग केंद्रावर ३४ तर ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन येथे ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची मंगळवारी नोंद झाली. रत्नागिरीला ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर हर्णेला ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here