सोमवारी रात्री या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकावणाऱ्या विद्यार्थीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टरवरून वादही सुरू झाले. या विद्यार्थीनीने स्वत: या पोस्टरबाबत खुलासा केला आहे.

मुंबई: जेएनयू हल्ल्याविरोधात मागील दोन दिवसांपासून गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थी-युवकांचे आंदोलन सुरू होते. सोमवारी रात्री या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकावणाऱ्या विद्यार्थीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टरवरून वादही सुरू झाले. या विद्यार्थीनीने स्वत: या पोस्टरबाबत खुलासा केला आहे.

जेएनयू हल्ला विरोधी आंदोलन फुटीरतावाद्यांचे असल्याचे ‘फ्री काश्मीर’च्या पोस्टरमुळे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यावरून राजकारणही पेटू लागले आहे. फ्री काश्मीरचे पोस्टर झळकावणाऱ्या मेहक मिर्झा प्रभू तरुणीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरमध्ये मागील १५० दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहे. आपण इथे राहून त्यांच्या अडचणी समजू शकत नाही. आपल्यासारखे स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांना मिळाले पाहिजे. मी काश्मीरमधील नसून मुंबईमधले असल्याचे मेहकने स्पष्ट केले.

मेहकने झळकावलेले फ्री काश्मीरचे पोस्टर हे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची मागणीशी सुसंगत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, मेहकने हे आरोप फेटाळून लावला आहे.


‘या’ संघटनेने घेतली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी

  • https://maharashtratimes.indiatimes.com/
  • https://maharashtratimes.indiatimes.com/

In Videos: आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर; काय म्हणते ‘ती’ तरुणी

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here