मुंबई: ‘ आत्महत्येच्या चौकशीच्या प्रकरणात भाजपचा आक्षेप मुंबई पोलिसांवर कधीच नव्हता. आमचा आक्षेप मुंबई पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावाला आहे,’ अशा शब्दांत भाजपचे नेते यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे.

सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयला देण्याची मागणी भाजपनं सातत्यानं लावून धरली आहे. त्याला उत्तर देताना भाजपचा मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. शिवसेनेच्या या आरोपाचं विखे-पाटील यांनी आज खंडन केलं. ‘मुंबईचं पोलीस दल हे जगातील एक उत्कृष्ट पोलीस दल आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाही शंका नाही. राज्य सरकारकडून त्यांच्यावर येत असलेल्या दबावाला आमचा आक्षेप आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची जी वेगवेगळी विधानं समोर येताहेत, त्यामुळं देखील संशयाला जागा आहे, असं विखे म्हणाले. ‘मुळात राज्य सरकारकडे काही लपवण्यासारखं नसेल तर सीबीआय चौकशीला परवानगी का दिली जात नव्हती? सत्य बाहेर आलंच पाहिजे. कुणा व्यक्तीच्या विरोधात आमची भूमिका नाही. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. राजकीय नेते, बॉलिवूड व अंडरवर्ल्डचाही संबंध आहे. त्यामुळं राज्य सरकारनं सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यास हरकत नव्हती. आता सीबीआयनं प्रकरण हाती घेतलंच आहे तर सत्य बाहेर येईल,’ असंही ते म्हणाले.

‘कोणी कोणावर काय आरोप केलेत, याच्याबद्दल मला बोलायचं नाही. आपली पाटी स्वच्छ आहे असं सरकारला वाटत असेल तर सरकार भीती का बाळगते,’ असा प्रश्नही विखे यांनी केला. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक प्रकरण झाली आहेत. जी मंडळी आज सत्तेत आहेत, त्यांच्या सोबत आम्ही अनेक बाबतीत सरकारकडे सीबीआयची मागणी करत होतो. हे काही पहिल्यांदाच होत आहे असं नाही,’ असंही विखे म्हणाले.

डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशनच्या वतीने विळदघाट येथे कै. श्रीमती सिंधुताई विखे पाटील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here