”ची संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांसंबंधी एक बातमी रिट्विट करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांवर खोटं बोलण्याचा आरोप करत त्यांना प्रश्न विचारलाय. ‘पंतप्रधान खोटं का बोलत आहेत?’ असं ट्विट त्यांनी केलंय.
दोन दिवसांतच संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून चिनी अतिक्रमणाशी निगडीत कागदपत्रं हटवण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा ट्वीट करत थेट पंतप्रधानांवर हल्ला केला. ‘चीनविरुद्ध उभं राहणं तर सोडाच पण भारताचे पंतप्रधान त्यांचं नाव घेण्याचीही हिंमत करत नाहीत. चीननं आपल्या भागात केलेली घुसखोरी नाकारण्यानं आणि वेबसाईटवरून कागदपत्रं हटवल्यानं तथ्य बदलणार नाही’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.
वाचा :
वाचा :
उल्लेखनीय म्हणजे, खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक झडपेनंतर गेल्या महिन्यात यांनी ‘कुणीही भारतीय क्षेत्रात घुसखोरी केलेली नव्हती आणि आताही कुणी घुसखोरी केलेली नाही’ असं म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून सतत पंतप्रधान मोदींवर खोटं बोलण्याचा आरोप करण्यात येतोय.
गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात भारताचे २१ जवान शहीद झाले होते. हे भारताकडून अधिकृतरित्या स्वीकार करण्यात आलं. परंतु, याच हल्ल्यात चीनचे ४५ सैनिक मारले गेल्याच्या बातम्या मात्र चीन सरकारकडून अधिकृतरित्या अद्याप स्वीकार करण्यात आलेल्या नाहीत.
‘चीनने १७ – १८ मे रोजी लडाखमध्ये कुंगरांग नाला (हॉटस्प्रिंगच्या उत्तरेत पेट्रोलिंग पॉईंट १५ जवळ), गोगरा (पेट्रोलिंग पॉईंट १७ ए) आणि पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर अतिक्रमण केलं’ असा उल्लेख संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या या कागदपत्रांमध्ये करण्यात आला होता.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.