Teacher dies with son in accident chhatrapati sambhaji nagar news; १५ वर्षानंतर पहिल्यांदाच आला ‘तो’ आनंदाचा क्षण, पण वाटेत मृत्यूने गाठलं; बापलेकाचा अंत डोळ्यांत पाणी आणेल
छत्रपती संभाजीनगर :प्रत्येक जन्माचा शेवट हा मृत्यू आहे. पण तो कधी येईल, याचा काही नेम नाही. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. जिथे एका शिक्षकासोबत असं काही प्रसंग घडला की वाचून तुमचेही डोळे पाणावतील. १५ वर्षानंतर पहिल्यांदाच पगार झालेल्या शिक्षकाचा त्याच्या मुलासोबत त्याच दिवशी मृत्यू झाला. सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारी ही घटना आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरात पत्नी, मुलासह कपड्याची खरेदी करून गावाकडे जाताना बापलेकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना नक्षवाडीतील स्मशानभूमीजवळ २ टिपरच्या मध्यभागी चिरडल्यामुळे घडली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पत्नीदेखील गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. गरम होतंय म्हणून महिला अंगणात झोपली, रात्री अचानक गावकरी लागले ओरडायला; क्षणात मृत्यू या अपघातात मृतांमध्ये शिक्षक संजय सुखदेव दहिफळे (४२) आणि त्यांचा मुलगा समर्थ संजय दहिफळे (१२, रा. पिंपळवाडी, ता. पैठण) या दोघांचा समावेश आहे. तर संजय यांची पत्नी वर्षा (३५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. संजय हे विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
क्षणभरही टिकला नाही आनंद….
संजय यांची सासरवाडी बीडबायपासजवळ आहे. त्यांची पत्नी मुलासह माहेरी आली होती. त्यांना घेण्यासाठी संजय हे दुचाकीवरून (एमएच २०, ८८३५) आले होते. १५ वर्षानंतर पहिल्यांदाच पगार झाल्यामुळे संजय यांनी पत्नीसह मुलाला कपडे घेतले आणि सायंकाळच्या वेळी गावाकडे दुचाकीवरून जात होता. तेव्हा दोन टीपरने (एमएच २० जीसी ७५५९) त्यांच्या दुचाकीला चिरडले. त्यात बापलेकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.