पुणेः एसटी महामंडळाच्या बसेस व विविध महानगरपालिकांच्या बस रस्त्यावर कधी धावणार? हे सरकारनं स्पष्ट करावं, जर सरकार हे स्पष्ट करणार नसेल तर, १० ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुकानांची सम – विषम पद्धत कधी बंद करणार? छोटे दुकानदार, हातावर पोट असलेले कामगार यांची उपासमार होत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही? सार्वजनिक वाहतूक कधी सुरू होणार? सरकार हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

वाचाः

राज्यात पावसानं धुमाकुळ घातला आहे. या महिन्यात १५ दिवस पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येतंय अनेक ठिकाणी पूर-परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळं फक्त करोना-करोना म्हणत बसू नका, पुराच्या संबंधित काय उपाययोजना केल्या आहेत त्याचं उत्तर द्या?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

वाचाः

हॉटस्पॉटमध्ये या वर्षाच्या तुलनेने गेल्यावर्षी अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात गेल्या वर्षी मे महिन्यात ४ हजार ००७ मृत्यू झाले तर, यावर्षी मे महिन्यात १ हजार ६०५ मृत्यू झाले आहेत. तर, मुंबईत ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली, ही आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळाली असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here