पुणे:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून एक मागणी आहे ती म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज असणे. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून, सापांपासून धोका असतो. रात्री अपरात्री जेव्हा वीज असेल तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावं लागत. अशा वेळी स्वतःच्या रक्षणासाठी त्याला निवाऱ्याची आवश्यकता असते. पण हे खर्चिक असल्याने शेतकरी हा पर्याय स्वीकारू शकत नाही. शेतातच कुठेतरी आडोशाला शेतकरी आपली रात्र काढतो. मात्र आता पुण्यातील एका निवृत्त जवानाने शेतकऱ्यांच्या या अडचणीवर अगदी कमी खर्चात एक भन्नाट उपाय काढला आहे.सैन्य दलातून निवृत्त झालेले कर्नल सुरेश पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहेत. आपल्या ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून ते धरणातील गाळ काढून धरणाची साठवण क्षमता वाढवण्यापासून त्यातून निघालेल्या गावातून नापीक जमीन पिकाउ करण्यापर्यंत अनेक कामे सुरेश पाटील यांनी केले आहेत. त्याचबरोबर आता सुरेश पाटील यांनी रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी एक भन्नाट जुगाड शोधून काढले आहे. तेही अगदी कमी खर्चात आणि पर्यावरण पूरक

अक्षय्यतृतीयेला रत्नागिरी हापूस घरी आणताय? कोकणचा राजा आणि कर्नाटकी आंब्यातला फरक असा ओळखाल
कर्नल सुरेश पाटील यांनी या भंगारातील बसचं रुपडं असं बदलवले आहे की पहिल्या नजरेत ही बस आहे की एखाद टुमदार घर हे लक्षात येणं देखील अवघड आहे. ही बस कर्नल सुरेश पाटील यांनी अगदी कमी पैशात खरेदी केली आणि ते राहत असलेल्या घोरपडी भागातील घराच्या अंगणात ठेवली. बस मधील शीट आणि इंजिन हे विकून टाकले आणि त्याच पैशातून या भंगारातील बसचे एका टुमदार घरात रूपांतर केलं. शेतकऱ्यांना रात्री उशिरा शेतात निवारा भेटावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता

या बसमधील केबिनमध्ये शहाबादी फरशी बसवत बसमधील केबिनमध्ये त्यांनी स्वच्छतागृह बनवलं. बसच्या छतावर पाण्याची एक टाकी ठेवली. तेच पाणी स्वच्छतागृहात वापरले. तर तिथून निघणाऱ्या सांडपाण्यावर त्यांनी घरासमोर एक सुंदर बाग फुलवली आहे. तर केबिनच्या मागच्या भागात एक लाकडी प्रशस्त बेड आहे. गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी टेबल फॅन देखील आहे. इतकंच काय तर वाचन करण्यासाठी बेडच्या जवळच एक मोठं बुकशेल देखील बनवलं आहे.

इन्स्टावर मैत्री, लग्न करुन थेट हॉटेलवर घेऊन गेला, सतत ३ दिवस तरुणीसोबत सुरू होता भयंकर प्रकार
भंगारात निघालेली बस शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोकळ्या जागेवर ठेवावी आणि त्यातून अशापद्धतीने आपल्यासाठी निवारा कसा करावा याच उत्तम उदाहरण कर्नल सुरेश पाटील यांनी दाखवून दिल आहे. याबद्दल अधिक बोलताना सुरेश पाटील म्हणतात, ‘दरवर्षी भंगारात लाखो बस आपल्याकडे लिलावात काढल्या जातात. पर्यावरण रक्षणासाठी टाकाऊ पासून टिकाऊ करणं गरजेचं असतंच आणि यामुळे शेतकऱ्यांना देखील शेतात निवाऱ्यासाठी घर बांधण्याची गरजच नाही. या बसचे घर बनवताना विजेसाठी सोलर पॅनलचा देखील वापर करू शकतो.

या पार्यायामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने रक्षण होऊ शकते. रात्री वीज आल्यावर त्याला शेतात गेल्याशिवाय पर्याय नसतोच. शेतात पाणी सुरु केल्यानंतर शेतकरी रानात कुठेही बसतो त्यामुळे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. पण हा पर्याय जर त्याने वापरला तर त्याच्या जीवाला धोका तर होणारच नाही पण एक निवारा देखील चांगला होऊ शकेल. कर्नल सुरेश पाटील यांच्या या जुगाडाची चर्चा सध्या राज्यभर होत आहे. आणि शेतकऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद याला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काळ्या पाठीचे खेकडे अन् गावरान कोंबडी; ग्राहकांना अस्सल जेवू घालण्यासाठी पठ्ठ्याचा भन्नाट व्यवसाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here