वसीम रिझवी यांचे उत्तर
ज्यांनी मंदिरे तोडली ते तुमचे पूर्वज होते, असे रिझवी यांनी ओवेसी यांना म्हटले आहे. ज्यांचे हक्क तु्म्ही काढून घेतले, त्यांचे हक्क भारतीय राज्यघटनेने त्यांना दिले आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे रक्त वाहण्याचे राजकारण आता बंद करा आणि जिहादच्या नावावर मुस्लिमांना लढवू नका, असेही रिझवी यांनी म्हटले आहे.
रिझवी यांनी केला व्हिडिओ जारी
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष रिझवी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ओवेसी यांना उत्तर दिले आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे. तेव्हा हा निर्णयापुढे आता ओवेसी यांनी गप्प बसले पाहिजे, असे रिझवी म्हणाले. आम्ही सर्व भारतीय संविधानाच्या नियमांना बांधील आहोत आणि त्याच सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त केला आहे, असेही रिझवी म्हणाले.
वाचा-
असदुद्दीन ओवेसींनी साधला निशाणा
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावरून एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जायला नको होते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. मोदी हे कुण्या विशिष्ट धर्माचे पंतप्रधान नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टबरोबर ५ ऑगस्टची तुलना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणाचा पराभव केला, हे मी विचारू इच्छितो, असा सवाल उपस्थित करत हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, असे ओवेसी म्हणाले.
वाचा:
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times