मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळतो. आरसीबीने अखेरची लढत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाली होती. बेंगळुरूमध्ये झालेल्या या लढतीत दोन्ही संघांनी धावांचा डोंगर उभा केला होता.
सिराजने या गोष्टीची माहिती तातीडने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरुद्ध पथकाला दिली होती. त्यानंतर या प्रकरणी तातडीने सूत्रे हलली आणि संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिराजशी संपर्क करणारी व्यक्ती सट्टेबाज नव्हती. तर मॅचवर सट्टा लावणारा होता. तो हैदराबाद येथील एक ड्रायव्हर आहे. सट्टेबाजीत मोठी रक्कम त्याने गमावली होती. त्यामुळे संघाच्या आतील बातमीसाठी सिराजशी संपर्क केला होता.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू असून याबाबत अधिक तपशील समोर आलेला नाही. आयपीएलमध्ये याआधी फिक्सिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक फार अलर्ट राहते. आयपीएलमध्ये एका संघासोबत ACUचा एक तरी अधिकारी असतो, जो खेळाडूंसोबत हॉटेलमध्ये थांबतो. त्याची नजर प्रत्येक गोष्टीवर असते. प्रत्येक खेळाडूने काय करावे, काय करू नये याची माहिती तो देत असतो. जर एखाद्या खेळाडूने अशा प्रकारची माहिती दिली नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाते.
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने आयपीएल दरम्यान अशा प्रकारे एक व्यक्तीने संपर्क केल्याची माहिती बोर्डाला दिली नव्हती, तेव्हा २०२१ मध्ये त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. इतक नाही तर फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलस या दोन संघांवर प्रत्येकी दोन वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.