नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने जबरदस्त कामगिरी करत १४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या मुलाने अर्जुनने तुफान गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात भुवनेरश्वर कुमारला आउट करुन आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतली.

भुवनेश्वर कुमारने १४ वर्षांपूर्वी सचिनला केलेलं आउट

रणजी ट्रॉफीच्या २००८-२००९ सीजनच्या फायनलमध्ये सचिन तेंडुलकर मुंबईकडून खेळत होता. त्यावेळी भुवनेश्वर कुमार १९ वर्षांचा होता आणि उत्तर प्रदेशच्या टीममधून खेळत होता. दोघ संघांमध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये सचिनसमोर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भुवनेश्वर कुमारने सचिनला शुन्यावर आउट केलं होतं.

अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण आणि बाप लेकाचा अजब योगायोग

या विकेटनंतर भुवनेश्वर कुमारची सर्वत्र चर्चा होऊ लागली होती. भुवनेश्वर या विकेटसह सचिन तेंडुलकरला रणजीमध्ये शुन्यावर आउट करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. आता १४ वर्षांनी सचिनचा मुलगा अर्जुनने भुवनेश्वरला शुन्यावर आउट केलं.

अर्जुनच्या पदार्पणावेळी सचिनच्या मनात काय भावना होत्या; सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी सांगितली मास्टर बापाची अवस्था
भुवनेश्वर कुमार रणजी ट्रॉफीमध्ये सचिनला डकवर आउट करुन चर्चेत आला होता. त्यावेळी अशी कामगिरी कोणीही केली नव्हती. आता मंगळवारी झालेल्या सामन्यात अर्जुनने हैदराबादविरुद्ध शेवटची ओवर खेळली. यात त्याला २० धावांचा बचाव करायचा होता. सचिनच्या लेकाने १४ धावांनी संघाला विजय मिळवून दिला.

कॅमरुन ग्रीन प्लेयर ऑफ द मॅच ठरला. त्याने नाबाद ६४ धावा करत एक विकेट घेतली, पण अर्जुनने संपूर्ण खेळच पलटवला. अर्जुनच्या चेंडूवर भुवनेश्वर आउट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. IPL २०२३ मधील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय आहे.

मैदानावर पराभवाची मालिका संपेना आणि खेळाडूंवर आलं मोठं संकट, मॅचच्या आधी झाली चोरी
अर्जुन शेवटच्या ओवरसाठी मैदानात उतरला त्यावेळी सचिन अतिशय टेन्शनमध्ये असल्याचं दिसत होतं. सचिन डगआउटमधून ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला होता. अर्जुनच्या ओवरआधी कर्णधार रोहित शर्मा बराच वेळ अर्जुनशी बोलताना दिसला. त्यानंतर अर्जुनने मैदानात उतरत कमाल केली. अर्जुन तेंडुलकरने एक मॅच आधीच कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध डेब्यू केला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here