भोपाळ: ट्रेन उशिरा धावणं भारतीयांसाठी नवीन नाही. ट्रेन वेळेवर पोहोचल्यास आपल्याला सुखद धक्का बसतो. विविध कारणांमुळे ट्रेन उशिरानं धावतात. हवामान, गैरव्यवस्थापन यामुळे ट्रेनला उशिर होतो. मात्र मध्य प्रदेशात वेगळ्याच कारणामुळे एक्स्प्रेसला उशिरा व्हायचा. एक व्यक्ती वारंवार साखळी खेचायचा आणि ट्रेन थांबवायचा. या व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं असं तुम्हाला वाटेल. पण असं काही नाही. तो मुद्दामहून ट्रेनमधील साखळी ओढायचा. कारण त्याला ट्रेनमधील प्रवाशांना त्याला जास्त जेवण विकायचं होतं. साखळी ओढणारा हा कोणी गुन्हेगार नव्हता, तर ट्रेनच्या पँट्री कारचा मॅनेजर होता. रेल्वेच्या कारवाईतून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. प्रकरण भोपाळ रेल्वे विभागातील आहे. इथून जाणारी अनेकदा उशिरा इटारसीला पोहोचायची. या ट्रेनमधील साखळी वारंवार खेचली जायची. याची तक्रार आरपीएफला मिळाली. त्यांनी खास पद्धतीनं फिल्डिंग लावली आणि पँट्री कारच्या मॅनेजरला रंगेहात पकडलं. रेल्वे अधिनियमाच्या कलम १४१, १४५ अंतर्गत मॅनेजरला अटक करण्यात आली. अवैध पद्धतीनं ओळखपत्राशिवाय वेंडिंग करणारी ६ जणांची टोळी पकडण्यात आली. आरपीएफ आऊटपोस्ट बनापुरामध्ये उपनिरीक्षक धर्मेंद्र आणि आरक्षक सविता नंदन पवार यांनी काशी एक्स्प्रेसमध्ये गुप्तपणे तपास सुरू केला. या दरम्यान त्यांना पँट्री मॅनेजर सूरज सिंह साखळी ओढताना दिसला. त्याला रंगेहात पकडण्यात आलं. सूरज सिंह मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याची चौकशी करण्यात आली. ट्रेनला उशिरा व्हावा यासाठी सूरज सिंह साखळी ओढायचा. ट्रेन इटारसी रेल्वे स्थानकात उशिरा पोहोचावी. प्रवाशांना उशीर व्हावा, या हेतूनं सूरज ट्रेनची साखळी खेचायचा. त्यामुळे प्रवासी पँट्री कारमधून जेवण मागवायचे. ट्रेन वेळेत इटारसीला पोहोचली असती, तर त्याच्याकडच्या जेवणाची विक्री घटली असती. त्यामुळे सूरज वारंवार साखळी ओढून ट्रेनला उशीर करायचा.
Home Maharashtra पँट्री मॅनेजर साखळी खेचायचा, ट्रेन लेट; पवारांनी फिल्डिंग लावून पकडले, कारण ऐकून...