ठाणे (कल्याण): कल्याण जवळील आंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी एका मुलीची छेड काढल्याचा आरोप एका गटाने दुसऱ्या गटातील मुलावर केला होता. याच कारणावरून काल रात्रीच्या सुमारास या दोन्ही गटात रात्रीच्या सुमाराचा वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या राड्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मुलीची छेड काढल्याच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळील आंबिवली परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. या राड्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या राड्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मुंबई लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, वाद मिटवणाऱ्या महिला पोलिसालाही दुखापत; व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून कल्याण खडकपाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इराणी, हुसेन इराणी, अब्बास इराणी यांच्यासह वैभव पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

RR vs LSG Live Score: टेबल टॉपर्सच्या लढतीला सुरुवात, लखनौची पहिली फलंदाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here