मुंबई:अक्षय्य तृतीयेच्या ((Akshaya Tritiya) ) आधी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याला (Gold Price Today) मोठी मागणी असते. कारण, अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र, यावेळी सराफा बाजारात विशेष मागणी दिसून येत नाहीये. परिणामी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी संध्याकाळी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ जून २०२३ च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १.११ टक्क्यांनी म्हणजेच ६७१ रुपयांनी घसरून ५९,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.बुधवारी जागतिक पातळीवरही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, कॉमेक्सवरील सोन्याचे फ्युचर्स १.५९ टक्क्यांनी किंवा ३२.२० रुपयांनी घसरून १९८७.५० प्रति औंसवर व्यापार करत आहेत. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत १.५४ टक्क्यांनी घसरून ३०.९६ डॉलर प्रति औंस १९७४.४९ वर व्यापार झाला.

अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याल? भाव, शुद्धता, घडणावळ सर्व एका क्लिकवर जाणून घ्या
चांदीच्या भावातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver Price Today) दरातही घसरण झाली आहे. बुधवारी संध्याकाळी एमसीएक्सवर चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत मोठी घसरण दिसून आली. ५ मे २०२३ रोजी डिलिव्हरीच्या चांदीचा भाव MCX वर १.४० टक्क्यांनी म्हणजेच १०५२ रुपयांनी कमी होऊन ७४,१९७ रुपये प्रति किलो होता. तर, ५ जुलै २०२३ रोजी डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १.३३ टक्क्यांनी म्हणजेच १०१५ रुपयांनी कमी होऊन ७५,५२० रुपये प्रति किलो होता.

अंगावर किलोभर सोनं असणारा आईस्क्रीम विक्रेता; विकतोय 24 कॅरेट सोन्याची आईस्क्रीम

सोन्यासोबतच बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. कॉमेक्सवर चांदीचा भाव १.८७ टक्क्यांनी म्हणजेच ०.४७ डॉलरवरुन घसरून २४.७९ डॉलर प्रति औंस झाला. त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत १.६० टक्के म्हणजेच ०.४० डॉलरने घसरून २४.७९ डॉलर प्रति औंस झाली आहे.

एका वर्षात अदानींच्या कर्जात इतक्या टक्क्यांनी वाढ, SBI बॅकेने दिले सुमारे २७० अब्ज रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here