बदलापूर: बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, ही हत्या तिच्या पतीनेच केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बदलापूर पूर्वेतील राऊत आर्केडमध्ये हा प्रकार घडला असून यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.

बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरातील राऊत चौकात राऊत आर्केड नावाची इमारत आहे. या इमारतीत राजश्री गणेश भोसले ही ३५ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलासह वास्तव्याला होती. आज दुपारच्या सुमारास ही महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून प्रवेश केला असता राजश्री यांच्या गळ्यावर भोसकून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.

योगींची दहशत, एन्काऊंटरने थरकाप, कुख्यात गुंड अतिक अहमदही थरथरायला लागलाय

यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह ताब्यात घेत बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, राजश्रीची हत्या तिचा पती गणेश भोसले यानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीने पोलिसांचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गणेश हा फरार झाला असून त्याचा फोनही बंद येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नसून बदलापूर पूर्व पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपयशी अर्जुनच्या आयुष्यात काय ठरला टर्निंग पॉइंट, सचिनने काळजावर दगड ठेवून घेतला निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here