बुलढाणा :संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आनंद सागर येथे जाण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. जवळपास २२ वर्षांपूर्वी धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या आनंद सागरचा प्रकल्प अचानक बंद झाला. मात्र काही दिवसांपासून आनंद सागर पुन्हा सुरु होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आल्याने भक्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु या बाबत संस्थानाकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाकरता भक्तांची गर्दी नेहमीच असते. येथे आल्यावर श्रींच्या दर्शनानंतर भक्तगण आनंद सागर येथे जात असे. श्री संत गजानन महाराज संस्थानकडून २००१ मध्ये धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकर व उभारणी करण्यात आली होती. शेगावातील मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येत असे. यामुळे येथे पर्यटन वाढलं होतं.

मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि आज माध्यमांमध्ये पुन्हा एकदा याची चर्चा रंगल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा आनंद सागर सुरू होणार की काय? याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.

माऊलीमुळे मृत्यूला चकवा; आईने बसमधून उतरवलं, बोरघाट अपघातातून आराध्य बालंबाल बचावला
गजानन महाराज संस्थान हे शिस्तबद्ध आणि प्रसिद्धीपासून दूर असलेले संस्थान म्हणून ओळखलं जातं. फक्त भाविकांची सेवा हेच एक व्रत घेऊन संस्थान सदैव कार्यरत असते. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे चांगल्या पद्धतीने कसे नियोजन करण्यात येईल यावर संस्थानाचा नेहमी भर असतो.

मागील दोन दिवसापासून आनंद सागरबाबत ज्या चर्चांना उधाण आले आहे, याबाबत सध्यातरी संस्थानाच्या वतीने आनंद सागर कधी सुरू होणार किंवा कसे असणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तूर्तास या फक्त सोशल मीडिया आणि माध्यमांतीलच चर्चा असल्याचं दिसतंय. त्यामुळे नेमकं आता येणाऱ्या काळामध्ये भाविकांना आनंद सागरबाबत अधिकृत गोड बातमी केव्हा मिळते, यासाठी अजून तरी काही वेळ वाट पाहावी लागेल असं म्हणायला हरकत नाही.

जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here