कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा एक चेहरा हा लोकांना मदत करणारा, विचार न करता काहीही बोलणारा, दिसायला प्रांजळ आहे, पण दुसरा चेहरा भयंकर आहे. ते आपल्याला मिळालेल्या सत्तेचा आणि संपत्तीचा वापर विरोधकांचा काटा काढून त्यांना जीवनातून उठवण्यासाठी करतात, असा खळबळजनक आरोप ग्रामविकास मंत्री यांनी केला आहे. ( slams )

दोन दिवसापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना एक पत्र पाठवून पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा दिला होता. या पत्राची प्रत त्यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ व पालकमंत्री यांना पाठवताना हे दोघे सतत विनाकारण आरोप करत असल्याचा उल्लेख केला होता. आरोप करताना मैत्र संस्कृती पाळत नसल्याचा टोलाही त्यांनी मारला होता. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

वाचा:

मंत्री मुश्रीफ यांच्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण करोना संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून करोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त आहे, असे वाटते. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांना मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन-तीन लाख लोकांना ते पाच वर्षे ते मदत करतील याची खात्री आहे. मी व माझ्या फाउंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर ते पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावतील, त्यामुळे ते जाहीर करत नाही.

वाचा:

मुश्रीफ यांनी पत्रात पाटील यांना उद्देशून पुढे म्हटले आहे की, मी काय तुमचा शत्रू नव्हतो. जरूर वैचारिक विरोधक होता. परंतु; मला संपवण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम ८८ अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला, एमएससी बँकेवर ८८ ची कारवाई सुरू केली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केलात ते फक्त मला संपवण्यासाठी! राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक म्हणून ज्यावेळी आमचे नेते अजित पवार व इतर काही नेते आपणास वरील कारवाईबाबत भेटले. आपण त्यांना आपल्या स्वभावाप्रमाणे म्हणाला, “होय, मी चौकशी लावली आहे, ती मागे घेणार नाही‌. त्यामध्ये मला हसन मुश्रीफ यांना अडकवायचे आहे”. यानंतर ईडी, इन्कमटॅक्स सत्र सुरू राहिले. हे मी कधीच केले नाही.

वाचा:

पाटील हे माहिती न घेता, माझी बदनामी करण्याची संधी सोडत नाहीत, असा आरोप करताना मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे की, ग्रामविकास विभागाने होमिओपॅथिक गोळ्या २३ रुपयांना घेतल्या, त्या बाजारामध्ये २ रुपयासा मिळतात, अशी बेजबाबदार विधानं केलात. मी बदनामी, फौजदारी दावा दाखल करण्याचे जाहीर केले. तसेच सदर गोळ्या खरेदी करण्याचे जिल्हा परिषदांना अधिकार दिले आहेत. त्यांना २ रुपयाला गोळ्या द्याव्यात, असे जाहीर आवाहन करुनही अद्याप तुमचे उत्तर नाही. परंतु; तुमच्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेखही नाही. दरम्यान, जनतेने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पूर्ण करेन. कोणाचेही आयुष्य बरबाद करणार नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी या पत्रातून हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here