वाचा:
कोकण व गोव्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे. जवळचं मडुरे स्टेशन सोडल्यानंतर गोव्याच्या हद्दीत असलेल्या बोगद्यात मध्यभागी भलीमोठी भिंत ट्रॅकवर कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे. चाकरमान्यांसाठी ही डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे. भिंतीचा मोठा भाग रुळांवर कोसळला असल्याने व पावसाची संततधार सुरूच असल्याने हा ढिगारा लगेचच हटवला जाण्याची शक्यता नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रुळ मोकळा करण्यास आणखी ८ ते १० दिवस लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या मार्गावरून दक्षिण भारतात जाणाऱ्या सर्व विशेष गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.
वाचा:
एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून दक्षिण भारतात जातात. रेल्वेची नियमित सेवा बंद असली तरी विशेष गाड्या मात्र धावत असून यापैकी प्रामुख्याने नेत्रावती व मंगला एक्स्प्रेसने कोकणात जाण्याचा पर्याय अनेकांपुढे होता. मात्र आता या सर्वच गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्याने चाकरमान्यांना रेल्वेने कोकणात जाण्याचा विचार सोडून द्यावा लागणार आहे.
वाचा:
दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असताना राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १४ ऐवजी १० दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. मात्र, त्याबाबतच्या गाइडलाइन्स अद्याप स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही १४ की १० हा गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यात एसटी बस वगळता अन्य खासगी वाहनांनी जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सक्ती आहे. या स्थितीत चाकरमानी पुरता मेटाकुटीला आला आहे. गणेशोत्सवाआधी अनेक विघ्ने पार करूनच त्याला गाव गाठावा लागणार हे निश्चित आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.