म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या कार्यालयात काम करतानाचे एका छायाचित्र ट्वीट केले. या छायाचित्रामध्ये त्यांच्यासमोर टेबलवर फायलींचा मोठा गठ्ठा दिसत आहे. याखाली ‘मिशन नो पेन्डसी, ऑफिस वर्क. क्लीअरिंग पेन्डसीज… कार्यालयीन कामकाज…’ अशा फोटोओळीही लिहिल्या आहेत. यावरुन उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव करीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. स्वत: अजित पवार यांनी या चर्चेमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे सांगितले. यानंतर या चर्चांना काहीसा विराम मिळाला. त्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा रंगली. प्रलंबित फायलींची सर्व कामे उरकून टाकायची, अशा आशयाच्या या ट्वीटमुळे नव्या बदलासाठी तयार व्हायचे, असेच काहीसे फडणवीस यांना सूचवायचे आहे, असा अर्थ काढला जात आहे.

‘कामे प्रलंबित ठेवायची नाहीत इतकाच अर्थ’

कोणतीही कामे प्रलंबित ठेवायची नाहीत, असे फडणवीस यांचे आदेश आहेत. एवढाच साधा सरळ त्याचा अर्थ आहे, असे शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास वाढत आहे. म्हणून गर्दी वाढत आहे. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत.

खारघर दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा लपवला जातोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पोलिसांवर दबाव: संजय राऊत

अडीच वर्षे फायली प्रलंबित होत्या. म्हणून फडणवीस यांनी तसे ट्वीट केले. त्यांचे सर्व मंत्र्यांना आदेश आहेत की, सर्वसामान्यांच्या फायली प्रलंबित ठेवायच्या नाहीत. यात सरकारमध्ये फेरबदल आहे असे नाही. उलट काही लोक आम्हाला जोडले जातील, हे आठ दिवसांपासून जे चालू आहे, त्यावरून कळले असेलच,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

54 COMMENTS

  1. over the counter amoxicillin canada: [url=https://amoxicillins.com/#]how to buy amoxicillin online[/url] where can you buy amoxicillin over the counter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here