अयोध्या :अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणारी राममूर्ती कोदंडधारी असेल. ही मूर्ती कर्नाटकातून आणलेल्या कृष्णशिळेतून साकारण्यात येणार आहे.अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय बैठकीचा मंगळवारी सायंकाळी उशिरा समारोप झाला. यामध्ये मूर्तीबाबतच्या तपशिलावर अंतिम निर्णय घेण्यात आला. ‘रामाची नवी मूर्ती पाच वर्षीय बालक रूपातील असेल. ती कोदंडधारी असणार आहे,’ अशी माहिती ट्रस्टचे सदस्य स्वामी तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी बुधवारी दिली.

पोलिसांनी पिकअप गाडी अडवली, बाजूला घेताच चालक पळाला; आत खोलून पाहताच सगळे हादरले
‘म्हैसूर येथील प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज ही पाच फूट उंच मूर्ती साकारणार आहेत. यासाठी कर्नाटकातील करकर आणि हेग्गेदेवेनकोटे गावांतून अयोध्येत कृष्णशिळा आणल्या आहेत. यातील कोणत्या शिळेतून मूर्ती साकारणार हे शिल्पकार ठरवतील,’ असे त्यांनी सांगितले.

‘संत, भूगर्भशास्त्रज्ञ, शिल्पकार, हिंदू धर्मग्रंथांचे तज्ज्ञ आणि ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यामध्ये विचारविनिमय झाल्यानंतर मूर्तीसाठी कृष्णशिळेची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मकरसंक्रांतीला मंदिराच्या गाभाऱ्यात रामाच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल,’ असे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नमूद केले.

बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here