मुंबई-सलमान खान आणि राखी सावंत यांचं नातं सर्वश्रुत आहे. अभिनेत्याने राखीची अनेक प्रकारे मदत केली आहे, जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हा राखीच्या आईच्या उपचारांसाठीही त्यानेची आर्थिक मदत केली. कदाचित याच कारणामुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने राखीला ईमेल पाठवून सलमानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही मुंबईत सुपरस्टारची हत्या करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या मेलमध्ये राखीला धमकीही देण्यात आली आहे.शबाना.. पाहिलं का हा इरफानचा मुलगा.. बाबिलची ओळख करून देतानाचे मनोज तुम्हालाही आवडतील
‘ई-टाइम्स’ने राखीशी संपर्क साधला ज्यात ती म्हणाली, ‘ते म्हणत आहेत की जर तू सलमान खानबद्दल बोललीस तर आम्ही तुला मारून टाकू. पण मी सलमानबद्दल बोलेन कारण माझ्या आईची तब्येत खराब असताना त्यानेच मदत केली होती. माझ्या आईला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी त्याने ५० लाख रुपये खर्च केले होते. मी का बोलू नये? त्याने सिद्धू मुसेवालावर गोळी झाडली. लोक मेणबत्ती घेऊन मार्चा काढतात आणि एखाद्याच्या मृत्यूनंतर रडतात. कोणी जिवंत असताना आपण भूमिका का घेत नाही?

राखी सावंतला आलेला ईमेल

राखी सावंतला आले दोन ईमेल

तिला आलेल्या ईमेलवर ती कोणतीही कायदेशीर कारवाई करत नसल्याचा खुलासाही राखीने केला आहे. ती म्हणाली, ‘मी कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाहीये. मी घाबरले आहे आणि गोंधळलेलीही आहे. काय करावे समजत नाही. मी ते देवावर सोडत आहे. राखीला प्रिन्स मावी नावाच्या व्यक्तीकडून दोन ईमेल आले, ज्यात त्याने आपण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा आणि गोल्डी ब्रार ग्रुपचा असल्याचा दावा केला. पहिला ईमेल राखीला १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी आला होता आणि दुसरा ईमेल १८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी आला होता.

राखी सावंतला आलेला ईमेल

पहिल्या मेलमध्ये काय लिहिले?

पहिला ईमेल रोमन हिंदीमध्ये लिहिला होता आणि त्यात लिहिले होते, ‘राखी आमचं तुझ्यासोबत कोणतंही वैर नाही. तू सलमान खान प्रकरणात पडू नकोस नाही तर तुझ्या अडचणीत वाढ होईल. तुझ्या सलमान भाईला आम्ही मुंबईतच मारू. भले मग त्याने कितीही सुरक्षा वाढवू दे. त्या सुरक्षेतच त्याला मारू. राखी हा तुझ्यासाठी शेवटचा इशारा आहे, नाही तर तू आणि तुझा भाऊ तयार रहा. (गुर्जर प्रिंस)

दुसऱ्या मेलमध्ये काय लिहिले आहे?

दुसऱ्या ईमेलमध्ये लिहिले की ‘राखी आम्ही तुला शेवटचं सांगत आहोत, सलमान खानला कोणीही वाचवू शकत नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही. सलमानचा गर्व मोडायचा आहे. त्याला पैसा आणि पावरचा खूप माज आहे. एकतर त्याने गोल्डीशी बोलावं किंवा मरायला तयार व्हावं. (गुर्जर प्रिंस)

मुंबई एअरपोर्टवर सहरी केली, राखी दुबईहून परतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here