बीड:परळी मार्गावर असलेल्या दिंद्रुड येथे काम आटोपून घराकडे निघालेल्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिंद्रुड येथील अशोक पांडुरंग ठोंबरे (वय 32) यांचे दिंद्रुडपासून जवळच असलेल्या बेलोरा फाट्यावर दुकान आहे रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

दुकान बंद करून अशोक ठोंबरे आणि दुकानात काम करणारा हमाल कांतीलाल खिराडे राहणार खुंदरी जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश हे दुचाकीवरून गावाकडे येत असताना बीड परळी महामार्गावरील सरस्वती नदीच्या पुलावर भरधाव टेम्पोने MH- 14 K 9315 या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन जवळपास एक किलोमीटर फरपटत नेले. यात दुचाकी वरील अशोक ठोंबरे यास माजलगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले व नंतर संभाजीनगर येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर कांतीलाल खिराडे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बाईकला भीषण अपघात, विद्यार्थ्यांच्या लाडक्या भटकर सरांनी जागीच प्राण सोडले; खेडमध्ये हळहळ

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुरडा झाला. असून संबंधित टेम्पो चालक फरार आहे पुढील तपास दिंद्रुड पोलीस करत आहेत. या अपघाता वेळी असलेले प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगतात की अपघात होत असतानाही भीषण वास्तव्य आम्ही पाहिलं टेम्पो चालकाने अपघात झाल्यानंतरही गाडी खरी अडकलेले असतानाही तसेच एक किलोमीटर पर्यंत धावत राहिला. मात्र, एका कठड्याला अडकल्याने टेम्पो खालील गाडी बाजूला सरकल्याने ती गाडी टेम्पोखालून बाहेर निघाली. मात्र टेम्पोचालक हा फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here